शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विजयी ध्वज फडकणार ?

By admin | Updated: January 26, 2015 02:59 IST

सलग पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघापुढे

सिडनी : सलग पराभव स्वीकारणा-या भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघापुढे वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत उद्या, सोमवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. या लढतीत भारतीय संघ विजय मिळविण्यास उत्सुक आहे. या लढतीत विजय मिळविला तर भारताला तिंरगी मालिकेत अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राखता येईल. विश्वकप मोहिमेच्या तयारीमध्ये नवे चैतन्य संचारण्यासाठी भारताला या लढतीत विजय आवश्यक आहे. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीनपैकी तीन सामने जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला सिडनी व पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. या दोन्ही सामन्यांपैकी एका लढतीत भारतीय संघाला बोनस गुणासह विजय मिळवावा लागेल. ईशांत शर्मा व रवींद्र जडेजा सोमवारच्या लढतीसाठी उपलब्ध असल्यामुळे भारतीय संघासाठी दिलासा देणारे वृत्त आहे. त्यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणार किंवा नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. जडेजाच्या क्षेत्ररक्षणाबाबत अद्याप साशंकता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा या लढतीत खेळणार नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताचा फलंदाजी क्रम यापूर्वीच्या लढतीप्रमाणेच राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा शिखर धवनसह डावाची सुरुवात करणार आहे. या लढतीत धवनला सूर गवसेल, अशी संघव्यवस्थापनाला आशा आहे. तळाची फलंदाजी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चर्चेचा विषय आहे. डेथ ओव्हर्समध्ये वेगाने धावा फटकाविण्याची गरज असते. स्टुअर्ट बिन्नीने गाबामध्ये फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला ही दुहेरी भूमिका सांभाळण्यासाठी विश्वकप संघात स्थान मिळाले आहे. बिन्नीने ब्रिस्बेनमध्ये गोलंदाजीची सुरुवात केली होती. त्यामुळे तो मध्यमगती गोलंदाजीचा पर्याय म्हणून खेळू शकतो. बिन्नीनंतर आर. अश्विन, अक्षर पटेल किंवा जडेजा आणि भुवनेश्वर कुमार फलंदाजीसाठी येतील. त्यामुळे तळातील फलंदाजीला बळकटी येईल. बिन्नीचा समावेश येथील अनुकूल खेळपट्ट्यांवर उपयुक्त सिद्ध होईल, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी म्हटले होते. दुसऱ्या बाजूचा विचार करता यजमान आॅस्ट्रेलिया संघावर मात्र अशा प्रकारचे दडपण नाही. पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी आॅस्ट्रेलिया संघ यापूर्वीच पात्र ठरला आहे. त्यामुळे सोमवारच्या लढतीत आॅस्ट्रेलिया संघ काही खेळाडूंना विश्रांतीची संधी देण्याची शक्यता असून विश्वकप स्पर्धेपूर्वी संघाचा समतोल साधण्यास प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)