शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकसाठीचा निधी देताना सतर्क राहणार - राज्यवर्धनसिंग राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:19 IST

२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली.

नवी दिल्ली : २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली. ‘नोकरशाहीमुळे येणा-या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘ आम्ही खेळाडूंचे गट केले आहेत. व्यावसायिक खेळाडूंकडे लक्ष देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. खेळाडूंना टारगेट आॅलिम्पिक पोडियम योजनेशी (टॉप्स) सरळ जोडता येण्यासाठी आम्ही पारदर्शी योजना आखली आहे. याची सुरुवात आम्ही २०१४मध्ये केली. जे खेळाडू आॅलिम्पिकपदकाचे दावेदार आहेत त्यांना सरावासाठी निधी देता यावा हा यामागचा हेतू आहे.राठोड पुढे म्हणाले, ‘भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी पैसे हा मुद्दा आता राहिला नाही, अनेक कार्पोरेट कंपन्या उदारमताने क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देत आहेत. आता आमच्याकडे पायाभूत सुविधेपासून उच्य कामगिरी करणाºया खेळाडूंपर्यत निधी उपलब्ध आहे.’भारताने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत याबाबत विचारले असता राठोड म्हणाले, ‘आम्ही २०२४ व २०२८ मध्ये होणाºया आॅलिम्पिकची तयारी सुरु केली आहे. आम्हाला हे विसरुन चालणार नाही. मात्र आताही आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. ‘टॉप्स’ समिती फक्त आमच्याच खेळाडूंवर लक्ष ठेवत नाहीत, तर त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवून आहेत.’ (वृत्तसंस्था)क्रीडा क्षेत्रात बदल होतील...आशियाई स्पर्धेत १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कास्यपदक जिंकल्याबद्दल राठोड यांनी खेळाडूंचे कौतुक केले. यावर्षी सुरु केलेल्या खेलो इंडिया स्कूलमुळे भारतीय क्रीडाक्षेत्रात मोठे बदल होतील असेही त्यांनी सांगितले.