शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

कोणाच्या पारड्यात विजय?

By admin | Updated: April 17, 2015 23:58 IST

जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला शनिवारी उपविजेत्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळण्याची आशा आहे.

पुणे : जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला शनिवारी उपविजेत्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळण्याची आशा आहे. आयपीएलमध्ये उभय संघांची वाटचाल काहीशी संथ झाल्यामुळे उभयतांना विजयाची आशा आहे.गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरने मुंबई इंडियन्सवर सलामीला विजय नोंदविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तीन गड्यांनी पराभवाचा धक्का बसला. या दोन्ही सामन्यांत केकेआरची फलंदाजी चांगलीच झाली. त्यांनी १७० वर धावा खेचल्या. दोन्ही लढतींत अर्धशतके ठोकणारा गंभीर फॉर्ममध्ये आहे. याशिवाय मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेल यांनीही धावा काढल्या. गोलंदाजी मात्र या संघाच्या चिंतेचा विषय आहे. मोर्नी मोर्केल, सुनील नरेन, युसूफ पठाण, शाकिब अल हसन आणि पीयूष चावला यांना हवे तसे यश आलेले नाही. नरेनने सुरेख मारा केला; पण गडी बाद करण्यात त्याला अपयश आले. दुसरीकडे पंजाबची सुरुवातही अडखळत झाली. या संघाने दोन सामने गमावले, तर एक विजय नोंदविला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्सला नमवून त्यांनी विजयी वाट धरली होती. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पुढच्याच सामन्यात पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला. मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, कर्णधार जॉर्ज बेली यांच्या उपस्थितीत पंजाबची फलंदाजी भक्कम तर आहे; पण सांघिक खेळी करण्यात त्यांना अपयश आले. मॅक्सवेल मुळीच फॉर्ममध्ये नसल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. त्याने तीन सामन्यांत केवळ १५ धावा केल्या आहेत. गोलंदाजही गडी बाद करण्यात अपयशी ठरले. मिशेल जॉन्सन, संदीप शर्मा, अनुरित सिंग आणि रिषी धवन यांनी मोठ्या धावा मोजल्या आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)किंग्स इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार),अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकीरतसिंग मान, कर्णवीर सिंग, मनन व्होरा, मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, रिषि धवन, संदीप शर्मा, शार्दूल ठाकूर, शॉन मार्श, शिवम शर्मा, तिसारा परेरा, वीरेंद्र सहवाग, रिद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक, योगेश गोळवलकर.कोलकाता नाईट राइडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नारायण, उमेश यादव, मोर्नी मोर्कल, रेयॉन टेन डोएशे, अजहर महमूद, योहान बोथा, पॅट कमिन्स, ब्रॉड हॉग, केसी करिअप्पा, आदित्य गढवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमित नरवाल, वीरप्रताप सिंग आणि वैभव रावल.