शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कौन बनेगा मुंबई श्री ? शरीरसौष्ठवाच्या सोहळ्यात अडीचशे स्पर्धकांची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:58 IST

पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटातील 154 खेळाडू आणि फिटनेस फिजीक खेळाडूंच्या  शतकी सहभागामुळे "स्पार्टन मुंबई श्री" पुन्हा एकदा पावरफुल्ल हिट ठरली.

मुंबई- राष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल अशा पीळदार सौंदर्यासह सुरू झालेल्या "स्पार्टन मुंबई श्री" जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईची ताकद अवघ्या देशाने पाहिली. पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य गटातील 154 खेळाडू आणि फिटनेस फिजीक खेळाडूंच्या  शतकी सहभागामुळे "स्पार्टन मुंबई श्री" पुन्हा एकदा पावरफुल्ल हिट ठरली. आज प्रत्येक गटात मुंबईचे पीळदार भवितव्य उतरल्यामुळे प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी खेळाडूंना प्रचंड संघर्ष करावा लागला. शरीरसौष्ठवाच्या एकंदर नऊ गटातून अंतिम फेरीसाठी 51 खेळाडूंची निवड केली असली तरी 'स्पार्टन मुंबई श्री"चा फैसला भास्कर कांबळे, सुशील मुरकर, निलेश दगडे, दिपक तांबीटकर, उमेश गुप्ता आणि नवा चेहरा असलेल्या रसेल दिब्रिटो यांच्यातच रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.

अंधेरीचे सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लब हे स्पार्टन मुंबई श्री निमित्ताने शरीरसौष्ठवाच्या आखीवरेखीव आणि पीळदार स्नायूंच्या देहांनी फुलून निघाले होते. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने पुन्हा एकदा "स्पार्टन मुंबई श्री"चं दिमाखदार आणि ग्लॅमरस सोहळा आयोजित करून आपल्या खेळाची ताकद दाखवून दिली. स्पर्धेला नेहमीप्रमाणे पामी उपस्थिती लाभल्याने आयोजकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. स्पार्टन मुंबई श्रीने आज देखण्या आयोजनाचा आणि स्पर्धकांच्या पामी उपस्थितीचा एव्हरेस्ट सर केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी अभिमानाने सांगितले.

 आज झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातून अव्वल सहा खेळाडूंची निवड करताना जजेसचा अक्षरश: घामटा निघाला. 55 किलो वजनी गटातून ओंकार आंबोवकर, अजिंक्य पवार, नितीन शिगवण, राजेश तारवे या कसदार खेळाडूंपैकी कोण अव्वल ठरेल हे सांगणे कठिण आहे. 60 किलो वजनी गटात अरूण पाटील, प्रीतेश गमरे, देवचंद गावडेपैकी एक जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरू शकतो. "छोटा बॉम्ब" म्हणून प्रसिद्ध असलेला उमेश गुप्ता 65 किलो वजनी गटात धमाका करणार हे स्पष्ट आहेच, पण त्याचे पीळदार स्नायू "स्पार्टन मुंबई श्री"च्या लढतीतही स्फोट घडवू शकतात, असा अंदाज शरीरसौष्ठव तज्ञच वर्तवत आहेत. स्पर्धेतला सर्वात गर्दीचा गट म्हणजे 70 किलो वजनी गट. सर्वाधिक 37 खेळाडू याच गटात होते आणि यातून सहा खेळाडू निवडताना जजेसना आपले कौशल्य पणाला लावावे लागले. या गटात मनोज मोरे, संतोष भरणकर, चिंतन दादरकर, आदित्य झगडेसारखे आपला जोर दाखवतील. 75 किलो वजनी गटात भास्कर कांबळे आपले जेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वोत्तम तयारीत दिसला. त्यामुळे तो उद्या अंतिम फेरीत सुजीत महापात्रा, रोहन गुरव, विशाल धावडे यांना सहज मागे टाकेल, यात तीळमात्र शंका नाही. सुशील मुरकरसमोर कडवे आव्हान

 गतवेळचा हॉट फेव्हरेट सुशील मुरकरला आपल्या 80 किलो वजनी गटात कडवे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सुशांत रांजणकर, अभिषेक खेडेकर,  स्वप्निल मांडवकर, गणेश पेडामकरसारखे एकापेक्षा एक असे खेळाडू असल्यामुळे सुशील मुरकरला अंतिम फेरीत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागणार आहे. 85 किलो वजनी गटात दिपक तांबिटकरलाही अव्वल स्थान मिळविताना झगडावे लागणार आहे. या गटात नितीन कोळी, कुमार पेडणेकर, सकिंदर सिगसारखे खेळाडू आहेत. 90 किलो वजनी गटात नवख्या रसेल दिब्रिटोची देहयष्टी पाहून सारेच चक्रावले आहेत. फारच कमी स्पर्धेत दिसलेला रसेल पूर्ण जोशात स्पार्टन मुंबई श्रीसाठी उतरल्यामुळे स्पर्धेत चुरस वाढली आहे. तो गटातून अव्वल आला तरी कुणाला याचे आश्चर्य वाटणार नाही. तसेच सर्वात वजनदार गटात निलेश दगडेचे अव्वल स्थान अबाधित राहिल,असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाचा 'स्पार्टन मुंबई श्री"चा विजेता छोटा बॉम्ब ठरतोय की नवखा खेळाडू बाजी मारतो की अनुभवी तारे चमकणार. थोडी प्रतीक्षा करा. शनिवारी रात्री कळेलच.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई