शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:42 IST

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला भालाफेक क्रीडा प्रकारात मिळाला नवा हिरो, जाणून घ्या त्याच्याबद्दल सविस्तर

दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरु असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा 'आर्मी मॅन' अर्थात दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा मैदानात उतरलेला नाही. तो मैदानात उतरला की, भारताचं भालाफेक क्रीडा प्रकारातील एक मेडल जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे यंदाच्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष गटातील भालाफेक क्रीडा प्रकारात भारताची पाटी कोरीच राहणार का? असा एक प्रश्न निर्माण झाला होता. पण 'आर्मी मॅन'ची कमी भरून काढत उत्तर प्रदेशचा पोलिसवाला भालाफेकपटू या क्रीडा प्रकारातील भारताचा नवा 'बाहुबली' ठरला आहे. सचिन यादव याने भालाफेक क्रीडा प्रकारात पर्सनल बेस्टसह भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. जाणून घेऊयात कोण आहे भारताचा भालाफेकमधी नवा बाहुबली? त्याच्यासंदर्भातील सविस्तर माहिती

...अन् नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत सचिन ठरला भारताचा नवा 'बाहुबली'

भालाफेक क्रीडा स्पर्धा म्हटलं की, नीरज चोप्रा चर्चेत असतो. दोन ऑलिम्पिक स्पर्धेसह प्रत्येक स्पर्धेत खास छाप सोडून नीरज चोप्रानं भारतीयांमध्ये या खेळाची आवड निर्माण केली आहे. त्याच्यापाठोपाठ आता या खेळात आणखी एक स्टार समोर येत आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत  सचिन यादव याने ८५.१६ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत पाकिस्तानच्या अरशद नदीनं ८६.४० मीटर अंतरावर भालाफेकत सुवर्ण कामगिरी करुन दाखवली. नीरज चोप्रा या स्पर्धेत उतरला असता तर निश्चित या क्रीडा प्रकारात भारताला आणखी एक पदक मिळाले असते. तेही गोल्ड. कारण डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने नुकतेच ९० मीटर अंतर भाला फेकला होता.  

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत या भारतीय खेळाडूंनी 'गोल्डन' कामगिरीसह रचला इतिहास

कोण आहे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकवणारा भालाफेकपटू सचिन?

सचिन यादव हा मूळचा उत्तर प्रदेश येथील बागपत जिल्ह्यातील आहे. ऑल इंडिया पोलिस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत  ८४.२१ मीटर लांब भाला फेकून तो लक्षवेधी ठरला होता. त्याने या स्पर्धेत ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९९४ मध्ये सतबीर सिंग यांनी ७९.८८ मीटर लांब भाला फेकत सेट केलेला विक्रम मोडीत काढला होता. सचिन यादव हा उत्तर प्रदेश पोलिस विभागात कार्यरत आहे. तो अनेक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसून येते. नीरज चोप्रा प्रमाणेच तो ९० मीटर लांब अंतर कापण्यासाठी मेहनत घेत आहे.