शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

भारत-पाक सामन्यादरम्यान गावस्कर जेव्हा माल्ल्यांना भेटतात

By admin | Updated: June 5, 2017 16:20 IST

भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा प्रत्येकाची उत्सुकता जबरदस्त ताणलेली असते. हा हायव्होलटेज सामना पाहण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते.

ऑनालइन लोकमतलंडन, दि. 5 - भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा प्रत्येकाची उत्सुकता जबरदस्त ताणलेली असते. हा हायव्होलटेज सामना पाहण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. याला कोणताच क्रिकेटप्रेमी अपवाद नाही. आताही एजबस्टन येथे सुरू असलेल्या सामन्यावेळीही हेच दिसून आले. भारतातील बँकांचे 9 हजार कोटी बुडवून लंडन गाठलेल्या विजय मल्ल्यालाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्याबाबतची उत्सुकता लपवता आली नाही. भारतातून पसार झालेला हा उद्योगपती इंग्लंडमध्येही कोणाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यास आवर्जून उपस्थिती लावल्याचे दिसून आले.भारत-पाक सामन्यादरम्यान विजय मल्ल्या आणि सुनिल गावस्कर यांची भेट झाल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून नेटिझन्सने विजय मल्ल्या आणि सुनिल गावस्करांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मल्ल्यांच्या भेटीमुळे सुनिल गावस्करवर नेटीझन्सने नाराजी व्यक्त करताना टीकेची झोड उडवली आहे. विजय मल्ल्यांच्या भेटीवर सुनिल गावस्कर यांनी अद्याप मौन बाळगले आहे. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. एप्रिलमध्ये माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.दरम्यान, दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.