शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोनं हटविलेल्या 'कोक'च्या दोन बाटल्यांचं पुढं काय झालं? पाहा भन्नाट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 17:54 IST

रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही.

ठळक मुद्देरोनाल्डोने हटविलेल्या कोकच्या बाटल्या एका व्यक्तीला मिळाल्या आहेत. म्हणजे हा मजेशीर व्हिडिओ एका नेटीझन्सने बनवला आहे.

नवी दिल्ली : पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडा नाराज दिसला. त्याने आपल्यासमोर कोकच्या बाटल्या हटवल्या, त्यावरुन सोशल मीडियावर भन्नाट मिम्सही व्हायरल झाले आहेत. आता, त्या बाटल्यांचा असाच एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. रोनाल्डो कधीच सॉफ्ट ड्रींक्स घेत नाही किंवा त्याची जाहीरातही करत नाही. पण, रोनाल्डोच्या या कृतीनं पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांच्यासह सर्वांच आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावरही रोनाल्डोचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरुन, अनेकांनी मिम्सही बनवले आहेत. आता, असाच एक मजेशीर व्हायरल झाला आहे. 

रोनाल्डोने हटविलेल्या कोकच्या बाटल्या एका व्यक्तीला मिळाल्या आहेत. म्हणजे हा मजेशीर व्हिडिओ एका नेटीझन्सने बनवला आहे. हा व्हिडिओ स्पोर्ट्समन हेमंत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, या व्हिडिओसह Brilliant असे कॅप्शनही दिलंय. आता, तुम्हीच पाहा हा भन्नाट व्हिडिओ   रोनाल्डो हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच वयाच्या 36 व्या वर्षीही तो मैदानावर युवा खेळाडूंप्रमाणे खेळ करू शकतो. तो दिवसाला सहा वेळा जेवतो, त्यात फळ, भाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्याशिवाय तो कसून सरावही करतो. 2020 च्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोनं त्याच्या मुलाला सॉफ्ट ड्रींक्स पिताना व चिप्स खाताना पाहिले होते आणि त्यानंतर त्यानं नाराजी व्यक्त केली होती.

कोका कोला कंपनीला 4 बिलियन्सचा फटका

आता रोनाल्डोनं Coca Cola च्या दोन बॉटल्स हलवल्या अन् दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. रोनाल्डोच्या त्या कृतीनं Coca Colaचे स्टॉक्स 1.6% टक्क्यांनी कोसळून ते 242 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 238 बिलियन अमेरिकन डॉलरवर आले. कोका कोला कंपनीला 4 बिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसला... भारतीय रक्कमेत सांगायचे तर हे नुकसान 2,93,27,80,00,000 इतके मोठे आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Mediaसोशल मीडियाPortugalपोर्तुगाल