शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पश्चिम विभाग खो-खो स्पर्धा : मुंबई विद्यापीठ संघाला जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 16:26 IST

मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

ठळक मुद्दे मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेमुंबई विद्यापीठाने बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद संघाचे आव्हान 18-17 असे 40  सेकंद राखून संपुष्टात आणले.

मुंबई : कर्णधार अनिकेत पोटे, निखील वाघे, सागर घाग, संकेत कदम, ऋषिकेश मुर्चावडे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पहिल्या डावात २ गुणांनी पिछाडीवर राहूनही मुंबई विद्यापीठाने बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद संघाचे आव्हान 18-17 असे 40  सेकंद राखून संपुष्टात आणले. तृतीय क्रमांकाची लढत कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीने जिंकताना एस.पी.पुणे विद्यापीठाचा 17-16 असा 4.10 मिनिटे राखून पराभव केला.

वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर मुंबई विद्यापीठ विरुद्ध  बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद यामधील अंतिम सामना अटीतटीमध्ये रंगला. अष्टपैलू हर्षद हातणकर (०.५० व १ मि., ४ गडी), पियुष घोलम (१.३० व ०.३० मि., ३ गडी), दुर्वेश साळुंखे (१.२० मि., ३ गडी), अक्षय भांगरे (०.४० व १.१० मि., २ गडी) यांच्या सुंदर खेळामुळे बीएएम युनिव्हर्सिटी-औरंगाबाद संघाने प्रारंभ दणक्यात करीत मुंबई विद्यापीठाविरुद्ध मध्यंतराला ११-९ अशी आघाडी घेतली. परंतु उत्तरार्धात विजयाचे पारडे मुंबई विद्यापीठाच्या बाजूने झुकाविताना कप्तान अनिकेत पोटे ( ०.१० व १ मि. व ३ गडी), निखील वाघे (०.२० व १ मि. व ४ गडी),  सागर घाग (१.३० व १.५० मि.,३ गडी), संकेत कदम (२.०० व १.३० मि., १ गडी), ऋषिकेश मुर्चावडे (०.३० व १.१० मि.,२ गडी), शुभम उत्तेकर (३ गडी) आदी खोखोपटूनी दमदार खेळ केला आणि मुंबई विद्यापीठाच्या विजेतेपदावर १८-१७ असा शिक्कामोर्तब केला.

निलेश जाधव (२.२० व १.३० मि.), अभिनंदन पाटील (०.२० व १.१० मि., ४ गडी), अरुण घोन्की (१.०० व २.२० मि., २ गडी) यांच्या अप्रतिम खेळामुळे शिवाजी युनिव्हर्सिटीने एस.पी.पुणे विद्यापीठावर १७-१६ असा ४.१० मिनिटे राखून विजय मिळविला आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शिवाजी युनिव्हर्सिटीने जिंकला. पुणे विद्यापीठातर्फे सागर लेंगरे, वैभव पाटील यांनी छान खेळ केला.   

टॅग्स :Kho-Khoखो-खोMumbai Universityमुंबई विद्यापीठ