शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

विंडीजचा सलग दुसरा विजय

By admin | Updated: March 21, 2016 02:29 IST

सॅम्युअल बद्रीचा सुरेख स्पेल आणि त्यानंतर आंद्रे फ्लेचरची नाबाद ८४ धावांची खेळी या बळावर वेस्ट इंडीजने विद्यमान चॅम्पियन्स श्रीलंकेवर वर्ल्ड ट्वेंटी-२० सामन्यात सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

श्रीलंका पराभूत : फ्लेचर, बद्री यांची निर्णायक कामगिरीबंगळुरू : सॅम्युअल बद्रीचा सुरेख स्पेल आणि त्यानंतर आंद्रे फ्लेचरची नाबाद ८४ धावांची खेळी या बळावर वेस्ट इंडीजने विद्यमान चॅम्पियन्स श्रीलंकेवर वर्ल्ड ट्वेंटी-२० सामन्यात सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे वेस्ट इंडीजचा संघ त्यांच्या गटातील गुणतालिकेत २ विजयांसह अव्वल स्थानी आहे.फ्लेचरच्या ६४ चेंडूंतील ६ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या बळावर वेस्ट इंडीजने श्रीलंकेने दिलेले १२३ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत ३ गडी गमावून १२७ धावा करीत पूर्ण केले. आंद्रे रसेल ८ चेंडूंत २० धावांवर नाबाद राहिला. फ्लेचर आणि रसेलने ५.३ षटकांत चौथ्या गड्यासाठी नाबाद ५५ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेकडून लेगस्पिनर जेफ्रे वांडरसे याने ११ धावांत १ गडी बाद केला. अन्य गोलंदाज आपला ठसा उमटवू शकले नाहीत. मिलिंद श्रीवर्धनेने ३३ धावांत २ गडी बाद केले.त्याआधी बद्री (१२ धावांत ३ बळी) आणि ड्वेन ब्राव्हो (२० धावांत २ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ थिसारा परेरा (४०) याच्या झुंजार खेळीनंतरही ९ बाद १२२ पर्यंतच मजल मारू शकला. डावखुरा फिरकी गोलंदाज सुलेमान बेन यानेदेखील सुरेख गोलंदाजी करताना ४ षटकांत फक्त १३ धावा दिल्या; परंतु त्याला बळी मात्र घेता आला नाही. वेस्ट इंडीजचा दोन सामन्यांतील हा सलग दुसरा विजय ठरला, तर श्रीलंकेचा दोन सामन्यांतील हा पहिला पराभव ठरला.ख्रिस गेल श्रीलंकेच्या डावादरम्यान स्नायूदुखीमुळे काहीवेळासाठी मैदानाबाहेर गेला. फलंदाजीसाठी जाताना पंचांनी त्याला रोखले. तथापि, फ्लेचरने त्याची उणीव भासू न देता वेस्ट इंडीजला वादळी सुरुवात करून दिली. त्याने अँजोलो मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात चौकार आणि षटकार ठोकल्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथलादेखील षटकार व चौकार मारत त्यांचा समाचार घेतला. त्याच्या स्फोटक खेळीने वेस्ट इंडीजचा विजय सुकर झाला.संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १२२. (थिसारा परेरा ४०, अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज २०, चांदीमल १६. बद्री ३/१२, ब्राव्हो २/२0, ब्रेथवेट १/३६).वेस्ट इंडीज : १८.२ षटकांत ३ बाद १२७. (आंद्रे फ्लेचर ८४, रसेल नाबाद २0. मिलिंद श्रीवर्धने २/३३, जेफ्रे वांडरसे १/११).