शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडीजचा धुव्वा

By admin | Updated: February 28, 2015 01:32 IST

मेलबर्नच्या मैदानात जे वादळ अर्ध्यावरच शमले होते, ते आज सिडनीच्या मैदानावर धडकले. या वादळाचं नाव आहे, ए. बी. डिव्हिलिअर्स

सिडनी : मेलबर्नच्या मैदानात जे वादळ अर्ध्यावरच शमले होते, ते आज सिडनीच्या मैदानावर धडकले. या वादळाचं नाव आहे, ए. बी. डिव्हिलिअर्स. रविवारी भारताविरुध्द तो लवकर बाद झाला होता. भारताविरुध्दच्या पराभवाचे जे शल्य त्याच्या मनात खोलवर रुतले होते, ती भडास त्याने आज वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर काढली. आज त्याने धुव्वाधार फलंदाजी करताना केवळ ६४ चेंडूत एकदिवसीय सामन्यातील वेगवान दीेडशतक ठोकले. त्याच्या १६२ धावा आणि इम्रान ताहिरच्या जादुई फिरकीच्या बळावर द. आफ्रिकेने ब गटात शुक्रवारी वेस्ट इंडीजवर तब्बल २५७ धावांनी विजय मिळविला. विश्वषकाच्या इतिहासात हा संयुक्तपणे सर्वांत मोठा विजय आहे.डिव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूंत नाबाद १६२ धावा ठोकताच आफ्रिकेने ५ गडी गमावून ४०८ धावा उभारल्या. हाशिम अमलाने ८८ चेंडूंत ६५, फाफ डुप्लेसिसने ७० चेंडूंत ६२ आणि रिनी रोसेयूने ३९ चेंडूंत ६१ धावांचे योगदान दिले. विश्वचषकात सर्वाधिक धावा उभारण्याचा विक्रम भारताच्या नावे आहे. भारताने २००७ साली त्रिनिदाद येथे बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा उभारल्यानंतर बरोबर २५७ धावांनीच विजय साजरा केला होता.ताहिरने ४५ धावांत अर्धा संघ गारद करताच विंडीजचा डाव ३३.१ षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला. काईल एबोट आणि मोर्ने मोर्केल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विंडीजकडून कर्णधार जेसन होल्डरने ५६, तसेच ड्वेन स्मिथने ३१ धावा केल्या. डिव्हिलियर्सने १७ चौकार आणि ८ षट्कार ठोकले. होल्डरला त्याने टार्गेट केले. ४८ व्या षटकांत ३४, तसेच अंतिम षटकांत ३० धावा खेचल्या. होल्डरने १० षटकांत १०४ धावा मोजल्या. विश्वचषकात सर्वांत जलद शतक ठोकण्याचा विक्रम आयर्लंडच्या केविन ओब्रायन याच्या नावे आहे. २०११ साली बंगलोर येथे त्याने इंग्लंडविरुद्ध ५० चेंडूंत शतक पूर्ण केले होते. द. आफ्रिकेचा तीन सामन्यांत हा दुसरा विजय होता. विंडीजचा चार सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत.लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा खुर्दा झाला. चौथ्या षटकापर्यंत १६ धावांत त्यांनी २ गडी गमावले. एबोटने गेलची (३) दांडी गूल केली. पुढच्या षटकात त्याने मर्लोन सॅम्युअल्सला तंबूची वाट दाखविली. ड्वेन स्मिथ याला मात्र एबोटच्याच चेंडूवर ताहिरने जीवदान दिले. मोर्केलने याला बाद केले. यानंतर ताहिरच्या फिरकीत विंडीजचे गोलंदाज अडकत गेले. स्मिथ (३१) आणि सिमन्स ००, सॅमी ५, रसेल ००, तसेच रामदीन यांना ताहिरने तंबूची वाट दाखविली. दरम्यान, होल्डरने ४४ चेंडूंत पहिले अर्धशतक नोंदविले. (वृत्तसंस्था)