शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

वेस्ट इंडीज बाद फेरीत

By admin | Updated: March 16, 2015 02:18 IST

कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजने रविवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या अखेरच्या

नेपियर : कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजने रविवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) ११७ चेंडू व ६ गडी राखून पराभव केला आणि सरस धावगतीच्या जोरावर आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. विंडीजपुढे यूएईचा डाव कमी धावसंख्येत गुंडाळण्याचे आव्हान होते. होल्डर (४-२७) आणि जेरोम टेलर (३-३६) यांनी अचूक मारा करीत यूएईचा डाव ४७.४ षटकांत १७५ धावांत गुंडाळला. सुरुवातीच्या पडझडीनंतर यूएईतर्फे नासीर अजिज (६०) व अमजद जावेद (५६) यांनी सातव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्येची मजल मारून दिली. दुखापतीमुळे या सामन्याला मूकलेल्या स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या विंडीज संघाची सुरुवात निराशाजनक झाली; पण जॉन्सन चार्ल्स (५५), जोनाथन कार्टर (नाबाद ५०) आणि दिनेश रामदीन (नाबाद ३३) यांनी उल्लेखनीय योगदान देत संघाला ३०.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठून दिले. विंडीज संघाने शानदार विजय मिळविला असला तरी, त्यांचे लक्ष पाकिस्तान आणि आयर्लंड संघांदरम्यानच्या लढतीच्या निकालावर होते. ही लढत टाय झाली असती तर वेस्ट इंडीज संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते; पण या लढतीत पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळविला. वेस्ट इंडीज व आयर्लंड संघांच्या खात्यावर प्रत्येकी सहा गुणांची नोंद आहे; पण सरस नेट रनरेटच्या आधारावर विंडीज संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला. आयर्लंडने सलामी लढतीत वेस्ट इंडीजचा पराभव केला होता. ‘ब’ गटात विंडीज संघ चौथ्या स्थानावर राहिला. कॅरेबियन संघाला उपांत्यपूर्व फेरीत २१ मार्चला वेलिंग्टनमध्ये ‘अ’ गटातील अव्वल संघ न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.होल्डरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. यूएईची १४ व्या षटकांत ६ बाद ४६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अजिज व जावेद यांनी संयमी फलंदाजी करीत शतकी भागीदारी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त मोहम्मद नावीद (१४) दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरला. विंडीजतर्फे कर्णधार होल्डर व जेरॉम टेलर यांच्याव्यतिरिक्त आंद्रे रसेलने २० धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले. विंडीज संघापुढे किमान षटकांमध्ये लक्ष्य गाठण्याचे आव्हान होते; पण त्यांच्या फलंदाजांना मॅकलिन पार्कच्या खेळपट्टीसोबत ताळमेळ साधताना अडचण भासली. चार्ल्सने वेगाने धावा फटकावल्या; पण ड्वेन स्मिथ (१५) व सॅम्युअल्स (९) यांना मोठी खेळी करता आली नाही. या दोन्ही फलंदाजांना मंजुला गुरुगेने तंबूचा मार्ग दाखविला. जावेदच्या (२९-२) गोलंदाजीवर माघारी परतण्यापूर्वी चार्ल्सने कार्टरसह तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. चार्ल्सने ४० चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व दोन षट्कार ठोकले. आंद्रे रसेलला (७) जावेदने बाद केले. त्यानंतर कार्टर व रामदीन यांनी संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. (वृत्तसंस्था)