शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

‘वेट, व्हाईल वी कनेक्ट!’

By admin | Updated: November 24, 2015 02:21 IST

कायम ‘व्यवस्थे’च्या परिघावरच ताटकळत राहिलेले देशातले अनेक अंधारे कोपरे नव्या ‘कनेक्टिव्हिटी’ने जगाशी जोडले जातात, तेव्हा तिथली माणसे, त्यांच्या आकांक्षांना कसे धुमारे

कायम ‘व्यवस्थे’च्या परिघावरच ताटकळत राहिलेले देशातले अनेक अंधारे कोपरे नव्या ‘कनेक्टिव्हिटी’ने जगाशी जोडले जातात, तेव्हा तिथली माणसे, त्यांच्या आकांक्षांना कसे धुमारे (आणि प्रश्न) फुटतात, हे शोधत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही दिशांना केलेल्या भारत-भ्रमंतीची अनोखी कहाणी रामनाथ गोएंका सन्मानाची मानकरी ठरली हा सन्मान आहे, ‘इंडिया’शी टक्कर देण्याची जोरदार तयारी चालवलेल्या ‘भारता’तल्या अस्सल हिमतीचा!- ‘लोकमत’च्या टीमने हा प्रवास केला होता गेल्या वर्षी. दीपोत्सव या दिवाळी अंकासाठी! रिपोर्ताज हा प्रकार प्रामुख्याने वापरला जातो, तो एखाद्या सामाजिक प्रश्नाचा मुळातून वेध घेण्यासाठी! ‘दीपोत्सव’च्या टीमपुढे असा प्रश्न नव्हता. होता तो एका उत्तराचा शोध! सतत उन्नत आणि स्वस्त होत खोलवर झिरपणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या आधाराने ग्रामीण भागातल्या दुर्लक्षित जनतेने स्वत:साठी शोधलेल्या उत्तरांचा शोध! त्यासाठी देशाच्या चार कोपऱ्यांतले चार दुर्गम प्रांत निवडले गेले... आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास!पूर्वेकडल्या इम्फाळच्या पोटातली दुर्गम खेडी, पश्चिमेकडल्या डोंगरउतारावरले आदिवासी पाडे, उत्तर प्रदेशातल्या रासवट खेड्यांमधले धूळभरले रस्ते आणि दक्षिणेच्या गर्द अंधाऱ्या जंगलात सौरऊर्जेच्या छत्र्या लावून झोपड्या उजळवून टाकणारे चेंचू.... या प्रवासात लोकमतच्या टीमने अनुभवले ‘माहिती’चा हात धरून वेगाने घडत असलेले एक स्थित्यंतर! देशातल्या ‘सिस्टीम’चे लक्ष जाण्याची वाट पाहाण्याला विटलेल्या गावकुसातल्या नागरिकांनी हवेतून अद्ृश्य रूपाने गावात पोचलेल्या स्पेक्ट्रमच्या लहरींवर बसून उडी घेण्याची तयारी चालवली आहे. मोबाइल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाने या अंधाऱ्या कोपऱ्यांना जगाशी ‘कनेक्टिव्हिटी’ देऊ केली. त्यातून नवा आत्मविश्वास येतो आहे आणि आजवर मनात ठेवलेले प्रश्न विचारून आपले हक्क मिळवण्याची हिंमतही!देशाचे भविष्यच बदलू घातलेल्या या स्थित्यंतराचा मागोवा घेणारी ही लेखमाला समीर मराठे, सुधीर लंके, दीप्ती राऊत आणि चित्रा अहेंथेम यांनी लिहिली होती.अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्व. रामनाथ गोएंकांच्या आठवणी सांगतांना पत्रकारितेतल्या त्यांच्या धाडसी वृत्तीचे विविध किस्से ऐकवले. स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या धाडसी पत्रकारितेचा आणि रामनाथजींच्या जीवनातील संघर्षाचा इतिहास फारसा वेगळा नाही, असेही जेटली म्हणाले. या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नजमा हेपतुल्ला, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, कपिल सिब्बल आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर विख्यात अभिनेते आमीर खान यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. त्यात आमीर खान यांनी देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाच्या बहुचर्चित मुद्द्याला हात घातला. सरकारकडून नि:संदिग्ध आश्वासक प्रतिसाद मिळत नाही, हीच खरी अडचण असल्याचे ते म्हणाले. माझी पत्नी किरण आताशा मला एक प्रश्न विचारू लागली आहे. आपण देश सोडून जायला हवंय का, हा तिचा प्रश्न फारच गंभीर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.