शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

आम्ही फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो : अजिंक्य रहाणे

By admin | Published: September 04, 2015 11:00 PM

आमच्यावर सध्या फिरकी गोलंदाजी योग्यपध्दतीने खेळत नसल्याची टीका होत आहे. परंतु, माझ्या मते आम्ही फिरकी गोलंदाजी वाईटपणे खेळत नसून दुर्दैवाने आमच्या विकेट्स फिरकी गोलंदाजीवर अधिक गेल्या आहेत

मुंबई : आमच्यावर सध्या फिरकी गोलंदाजी योग्यपध्दतीने खेळत नसल्याची टीका होत आहे. परंतु, माझ्या मते आम्ही फिरकी गोलंदाजी वाईटपणे खेळत नसून दुर्दैवाने आमच्या विकेट्स फिरकी गोलंदाजीवर अधिक गेल्या आहेत, असे भारताचा भरवाशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सांगितले. शुक्रवारी मुंबईतील सीसीआय येथे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्या ‘द इनसाइडर’ पुस्तकाचे भारताचा माजी कर्णधार राहूल द्रविड व अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी रहाणेने आपले मत व्यक्त केले.श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेमध्ये आम्ही फिरकी गोलंदाजीविरुध्द अधिक बाद झालो. यापुर्वी आॅस्टे्रलिया, दक्षिण आफ्रिकेविरुध्द वेगवान गोलंदाजी यशस्वीपणे खेळलो. मला नाही वाटत आम्ही फिरकी गोलंदाजी वाईट खेळतो. मात्र लंकेच्या फिरकीपटूंना त्यांचे श्रेय नक्कीच द्यावे लागेल. त्यांनी सुरेख मारा केला, असेही रहाणे याने सांगितले.क्रिकेटच्या बदललेल्या स्वरुपाबद्दल रहाणे म्हणाला की, आज क्रिकेट अधिक वेगवान झाले आहे. आम्ही व्यावसायिक खेळाडू असल्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपामध्ये खेळण्यास तयार राहण्याची सवय झाली असून ते आमच्या मनात पक्के असते. त्यामुळे आम्ही मानसिकरीत्या कायम तयार असतो. परदेशातील परिस्थितीशी जुळवून खेळणे महत्त्वाचे असते. आॅस्टे्रलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका येथे खेळणे माझ्यासाठी कायम आव्हानात्मक असते.आगामी आॅक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत यजमान ‘टीम इंडिया’च्या तयारीबाबत राहूल द्रविड म्हणाला की, या मालिकेसाठी भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुरली विजय दुखापतीतून सावरुन पुनरागमन करेल. त्याचबरोबर शिखर धवन, लोकेश राहूल आणि रहाणे यांच्या रुपाने भक्काम फलंदाजी असेल. शिवाय चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामुळे फलंदाजीला बळकटी येईल. या सर्वांवर भारतीय क्रिकेट अवलंबून असल्याने भविष्यात यांची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.(क्रीडा प्रतिनिधी)