शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"घराबाहेर पाऊल ठेवाल तर याद राखा"; १३ वर्षांचा संसार वाचवण्यासाठी बायकोची नवऱ्याला धमकी, नक्की काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 20:09 IST

नवरा बायकोमध्ये वाद होणं नवीन नाही, पण...

Wayne Rooney: नवरा बायकोच्या संसारात वाद होणं हे जोडप्यासाठी नवीन नाही. एखाद्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये भांडणं किंवा छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच. पण एका बायकोनं आपला १३ वर्षांचा संसार वाचवण्यासाठी आता थेट नवऱ्यालाच धमकी दिली आहे. घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही, अशी तंबी देत नवऱ्याला नजरकैदेत ठेवण्याची पूर्ण तयारीच तिने केली आहे. हे प्रकरण आहे महान फुटबॉलर वॅन रूनी आणि त्याची पत्नी कॉलिन यांच्यामधलं.

रूनीला सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तशातच 'एकटा घराबाहेर पडायचं नाही' असं फर्मानच वॅन रूनीच्या पत्नीने काढलंय आणि २४ तास त्याच्यावर नजर ठेवली जात आहे. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, ३६ वर्षीय रूनीवर २४ तास नजर ठेवण्याचा निर्णय त्याची पत्नी कॉलिन हिला घ्यावा लागला आहे. रूनीच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ वर्षांचे वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी पत्नीने हा उपाय शोधून काढला आहे. रूनी एकटा घराबाहेर पडू नये म्हणून पत्नी कॉलिन हिने आपला भाऊ किंवा इतर नातेवाईकांपैकी काहींना रूनीवर नजर ठेवायला सांगितली आहे.

रूनी आणि त्याची पत्नी कॉलिन यांना वैवाहिक जीवनात विविध गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. रूनी सातत्याने अमली पदार्थांचे सेवन करत असतो आणि विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याने त्याच्या पत्नीने आता कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहेत असं सांगितलं जातंय. एका रिपोर्टनुसार, त्या दोघांचं लग्न अनेकदा तुटण्यापर्यंत विषय ताणला गेला आहे. रूनीचं कायम दारू पिणं हेच संसारातील ताणतणावामागचं मुख्य कारण आहे. नशेच्या भरात त्याने असं काही केलं आहे की ज्यामुळे त्यांच्यात कडाक्याची भांडणं झाली आहेत.

वॅन रूनी अशाच काही कारणांमुळे आधीही चर्चेत आला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हॉटेल रूममध्ये त्याचे काही मुलींबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते. २००४ साली रूनीचं सेक्स स्कँडलमध्येही नाव जोडलं गेलं होतं. मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना एका २१ वर्षीय एस्कॉर्टशी शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी रूनी तिला १४० युरो द्यायचा असा खुलासा त्यावेळी झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात आठवड्यात रूनीच्या जीवनावर आधारित बायोपिक रिलीज केला जाणार आहे. त्या चरित्रपटाचं बजेट तब्बल १ मिलियन असल्याचं सांगितलं जातंय.

 

टॅग्स :Footballफुटबॉलhusband and wifeपती- जोडीदारSex Racketसेक्स रॅकेट