शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

वाशिमचा नारायण सुपर रॉदिनर

By admin | Updated: February 20, 2017 16:44 IST

फ्रान्सच्या धरतीवर आधारित ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात ठरलेल्या

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 20 - फ्रान्सच्या धरतीवर आधारित  ब्रेवेट  सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात ठरलेल्या कि.मि.नुसार प्रवास करणाऱ्या सायकलपटूला सुपर रॉदिनर हा बहुमान दिला जातो. हा बहुमान वाशिमच्या नारायणाने मिळविला आहे.  सुपर रॉदिनर  हा सायाकिंगच्या जगातील बहुमान प्राप्त करणारा वाशिम जिल्ह्यातील पहिला सायकल पटू नारायण व्यास ठरला आहे.

फ्रान्सच्या धरतीवर आधारित  ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात २०० कि.मी, २० तासात ३०० कि.मी., २७ तासात ४०० कि.मी. व ४० तासात ६०० कि.मी. सायकल ने पूर्ण करण्याऱ्या सायकल पटूला ह्यसुपर रॉदिनर हा बहुमान दिल्या जातो. फ्रांस देशातील या स्पर्धेला नागपूरकरांनी चांगलाच प्रतीसाद दिला आहे. मागील एका वर्षात वाशीमच्या सायकल स्वार ग्रुपने या स्पर्धेत भाग घेऊन वाशीमचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. या ग्रुपचा सदस्य नारायण व्यास याने २००,३००,४००, कि.मी. च्या स्पर्धा दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्या आहे. या स्पर्धेनंतर ६०० कि.मी. साठी १८ फ्रेब्रूवारीला सकाळी ५ वाजता त्याने नागपूरच्या झिरोमाईलपासून सुरुवात करून जबलपूर (मध्यप्रदेश) जवळील हुल्की या गावापर्यंत ३०० कि.मी. सायकलिंग करून पुन्हा ३००.कि.मी. झिरोमाईल (नागपूर) येथे परतायचे होते.असा ६०० कि.मी. चा ४० तासाचा प्रवास ३६ तासात पूर्ण करून नारायण व्यास यांनी  सुपर रॉदिनर हा सायाकिंगच्या जगातील बहुमान प्राप्त केला आहे. १८ स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता .

या स्पर्धेत ४८० किलोमीटरचे अंतर पार केल्यावर छिंन्दवाडा व शिवनी बायपास जवळील स्पीड ब्रेकरमुळे सायकल वरील नियंत्रण सुटल्यामुळे सकाळी ५ वाजताच्या दरम्यात त्याचा अपघात होऊन डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले व डाव्या पायाला सुद्धा मार लागला. आपली सायकल एका धाब्यावर ठेऊन तो १५ कि.मी. जवळच्या गावातील दवाखान्यात उपचारासाठी गेला.तेथील डॉकटरांनी उपचार करून त्याला दवाखान्यात भरती होण्यास सांगितले. मात्र तो दवाखान्यात भरती न होता उरलेले १२० कि.मी चे अंतर पूर्ण करण्यासाठी रवाना झाला. झीरोमाईल केवळ ७ कि.मी. राहले असतांना त्याची सायकल पंक्चर झाली. जवळच सायकल दुरुस्तीचे दुकान पाहून त्यांनी पुन्हा प्रवास सुरु केला व १९ फ्रेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांनी आपली स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून वाशीमकरांना शिवजयंतीची भेट दिली.

यानंतर डेक्केन क्लीफ्फहॅन्गर (पुणे ते गोवा) असे ६४२ कि.मी. अंतर ३२ तासात पूर्ण करून रॅम ( रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका ४८०० कि.मी. १२ दिवस) साठी तो प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.