शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

द वॉर्नर शो

By admin | Updated: May 1, 2017 01:47 IST

मिळालेल्या दोन जीवदानांचा फायदा कसा घ्यावा, हे डेव्हिड वॉर्नरने आज कोलकाता नाईट रायडर्सला दाखवून दिले. या सामन्यात केकेआरसाठी

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमतहैदराबाद, दि. 1 -  मिळालेल्या दोन जीवदानांचा फायदा कसा घ्यावा, हे डेव्हिड वॉर्नरने आज कोलकाता नाईट रायडर्सला दाखवून दिले. या सामन्यात केकेआरसाठी व्हिलन ठरला तो वॉर्नर नाही तर ख्रिस व्होक्स. व्होक्स याने दोन्ही वेळा वॉर्नरचा झेलसोडला.अव्वल स्थानावर असलेल्या केकेआरला सनरायजर्सकडून ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सर्वात लक्षवेधी होती ती कॅप्टन्स इनिंग, वॉर्नर याने ५९ चेंडूत १२६ धावा कुटल्या. आणि गौतम गंभीरकडून पुन्हा एकदा आॅरेंज कॅप हिसकावून घेतली. सामना असो की आॅरेंज कॅप यासाठी खरी लढत केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि सनरायजर्सचा वॉर्नर यांच्यातच होती. याबाजी मारली वॉर्नरने. सामन्याच्या आधीच आॅरेंज कॅपच्या शर्यतीत वॉर्नर गंभीरच्या मागे होता. मात्र या सामन्यात शतक झळकावून त्याने ही कॅप पुन्हा आपल्याकडे घेतली. आणि संघाला दोनशेच्या वर धावसंख्या उभारून दिल्यावर विजयही मिळवून दिला.आजचा दिवसच केकेआरचा नव्हता. केकेआरकडून तुफानी सलामी देणारा नरेन अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधार गंभीरही गरजेच्या वेळी मोठी खेळी करु शकला नाही.उथप्पा आणि पांडे यांनी डाव सांभाळला. मात्र त्यातच पावसाच्या अडथळा आला. षटकांचे नुकसान झाले नसले तरी फलंदाज दडपणाखाली आले. पांडे बाद झाल्यावर उथप्पाने अर्धशतक झळकावले. मात्र मोहम्मद सिराजने त्याला बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. उथप्पा बाद झाल्यावर हैदराबादचा विजय हा फक्त औपचारिकताच राहिली होती. उथप्पाने आजच्या सामन्यात चार षटकार लगावले. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २१ षटकार लगावले आहेत. तर वॉर्नरने या सामन्यात ८ षटकार लगावले. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत तब्बल २२ षटकार लगावले. आपल्या या खेळीने षटकारांच्या यादीत उथप्पालाही मागे टाकले आहे.