शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

वॉर्नर, ख्वाजा यांची शतके, आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

By admin | Updated: November 6, 2015 02:37 IST

डेव्हिड वॉर्नरच्या १३व्या आणि उस्मान ख्वाजाच्या पहिल्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध धावडोंगर

ब्रिस्बेन : डेव्हिड वॉर्नरच्या १३व्या आणि उस्मान ख्वाजाच्या पहिल्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध धावडोंगर उभारण्याकडे वाटचाल केली. वॉर्नरने २२४ चेंडू टोलवीत १६३ धावा ठोकल्या. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी आॅस्ट्रेलियाने दोन बाद ३८९ अशी मजल गाठली. ख्वाजा १०२, तसेच कर्णधार स्टीव्ह स्मिथ ४१ धावांवर नाबाद होते. स्मिथने यादरम्यान कॅलेंडर वर्षात हजार धावा पूर्ण केल्या. वॉर्नर जेम्स निशामच्या चेंडूवर स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेल देत बाद झाला. त्याने २२ चौकार व एक षटकार ठोकला. ही त्याची दुसरी सर्वोच्च खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या १८० धावा सर्वोच्च आहेत. भारताविरुद्ध पर्थमध्ये तीन वर्षांआधी वॉर्नरने या धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून मॅथ्यू हेडन ३०, मार्क टेलर १९, जस्टिन लेंगर १६ आणि मायकेल स्लेटर १४ या सलामीवीरांनी वॉर्नरपेक्षा अधिक शतके झळकविली आहेत. वॉर्नरने आज ज्यो बर्न्ससोबत १६१, तसेच ख्वाजासोबत १५० धावांची भागीदारी केली. पाक वंशाचा ख्वाजा याने १२३ चेंडूंत पहिले शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था) ख्वाजाचे कारकीर्दीत पहिले शतक७१ व्या षटकात वॉर्नर बाद झाला तेव्हा आॅस्ट्रेलियाच्या ३११ धावा होत्या. ख्वाजाने कर्णधार स्टीव्हन स्मिथसोबत सावध खेळून शतक गाठले. उस्मानने १३३ चेंडूंत दहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. गाबा कसोटीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. न्यूझीलंडने आज सहा गोलंदाजांचा वापर केला, पण आॅस्ट्रेलियाचा धडाका त्यांना रोखता आला नाही. संक्षिप्त धावफलक पहिला डाव आॅस्ट्रेलिया दिवसअखेर २ बाद ३८९जेए बर्न्स - ७१, डेव्हीड वॉर्नर - १६३, उस्मान ख्वाजा - १०२, स्टीव्ह स्मिथ - ४१गोलंदाजी : टीम साउदी - ६३/१,जेम्स निशाम ३६/१