शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

वकारने फेटाळले फिक्सिंगचे आरोप

By admin | Updated: November 22, 2015 03:59 IST

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यांत ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार

दुबई : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यांत ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले.वकार म्हणाले, ‘मला या आरोपाची माहिती नव्हती. याचे वृत्त मला काही वेळानंतर कळले. मला पाकिस्तान संघ व खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. सामन्यामध्ये काहीच चुकीचे नव्हते. जय-पराजय हा खेळाचा एक भाग आहे, पण त्यानंतर घडणाऱ्या बाबी निराशाजनक आहे. मी खेळाडूंबाबत समाधानी आहे.’ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने तिसऱ्या लढतीत पाकिस्तानच्या पराभवानंतर संघातील खेळाडूंवर फिक्सिंगचा संशय व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचार विरोधी समितीने पाक संघाच्या अनियमित फलंदाजी क्रमाबाबत चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त प्रकाशित केले. तीन धावबाद आणि फलंदाज चुकीचा फटका खेळून बाद होणे आणि निराशाजनक क्षेत्ररक्षण या बाबी संशय व्यक्त करण्यास पुरेशा आहेत. पाटा खेळपट्टीवर पाकिस्तान संघाचा डाव २०८ धावांत संपुष्टात आला. कर्णधार अजहर अली, शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान धावबाद झाले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ ४ बाद ९४ अशा निराशाजनक स्थितीत असलेल्या इंग्लंड संघाने या लढतीत ६ गडी राखून विजय मिळविला. (वृत्तसंस्था)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) शहरयार खान यांनी वॉनच्या टिष्ट्वटवर टीका करताना म्हटले की, ‘क्रिकेटवर संशय व्यक्त करणाऱ्याची मला चीड येते. वॉनने चुकीचे वक्तव्य केले. त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही हे प्रकरण आयसीसीपुढे मांडणार आहोत.’फिक्सिंगबाबत पाकिस्ताचा इतिहास खराब आहे. वर्ष २००० मध्ये माजी कर्णधार सलीम मलिकवर आजीवन बंदी घालण्यात आली. आॅस्ट्रेलियाचे शेन वॉर्न, मार्क वॉ आणि टीम मे यांनी १९९५ च्या दौऱ्यात त्याच्यावर लाच देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप केला होता. चौकशीनंतर वकार युनूस, वसीम अक्रम आणि मुश्ताक अहमद यांच्यावर दंड ठोठावण्यात आला.