शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चहलने शेतात घेतले गोलंदाजीचे धडे !

By admin | Updated: February 7, 2017 20:13 IST

हरियाणातील जिंद या लहान गावातून आलेला २६ वर्षांचा यजुवेंद्र चहल

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - हरियाणातील जिंद या लहान गावातून आलेला २६ वर्षांचा यजुवेंद्र चहल. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच आटोपलेल्या मालिकेत पहिल्यांदा मालिकावीराचा किताब जिंकणारा लेगब्रेक गोलंदाज! चहलच्या गोलंदाजीची सुरुवात शेतातून झाली. शेतात गोलंदाजीचा सराव करीत-करीत तो थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरला. यजुवेंद्र १० वर्षांचा असताना वडील केके चहल यांनी स्वत:च्या शेतात खेळपट्टी बनविली होती. या खेळपट्टीवर सातत्याने सराव करीत मुलगा भारतीय संघात पोहोचला. क्रिकेट आणि बुद्धिबळ हे यजुवेंद्रचे आवडते खेळ. त्याने क्रिकेटमध्ये चमकण्याआधी १२ वर्षे गटाच्या विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट आणि बुद्धिबळात देशाचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.यजुवेंद्रच्या मते देशासाठी खेळत असताना पैसा तर कमविता येतोच शिवाय लोकप्रियता देखील लाभते. चाहते आपल्याला सेलेब्रिटी समजतात. माझ्यासोबत हेच घडत आहे. इंग्लंडविरुद्ध बेंगळुरू टी-२०त २५ धावांत ६ बळी घेताच यजुवेंद्र चर्चेत आला. त्याचे वन डे आणि टी-२० पदार्पण तसे मागच्या मोसमात झाले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने मात्र त्याला नवी ओळख दिली.क्रिकेटमध्ये बुद्धिबळाची चाल खेळणारा खेळाडू अशी चहलची दुसरी ओळख आहे.अश्विन आणि जडेजा यांच्या अनुपस्थितीत संधीचे सोने करणाऱ्या चहलने सरावादरम्यान धोनी आणि विराट कोहली या दोघांचीही मने जिंकली. विशेषत: माहीने कुठल्या विकेटवर कसा चेंडू टाकावा आणि फलंदाजाचा कमकुवतपणा काय आहे, हे सांगून माझ्या यशात मोलाचा वाटा उचलल्याचे चहलला वाटते. माझ्या चेंडूवर चौकार- षटकार लागला तरी विराटने कधीही माझ्यावर दडपण आणले नाही. उलट जसा मारा करायचा असेल तसा तू बिनधास्तपणे कर, असे विराट म्हणायचा. कोच अनिल कुंबळे यांच्यासोबत बसून गोलंदाजीत सुधारणा केली.लग्न आईवडिलांच्या मर्जीनुसार!युवा यजुवेंद्रने अन्य युवकांसारखीच आयुष्याची योजना आखली आहे. तो म्हणतो, मीडियाने कुठल्या तरी मॉडेल किंवा हिरोईनसोबत माझे नाव जोडण्याआधी लग्नाबाबतची कॉन्सेप्ट स्पष्ट आहे. लग्न मी घरच्यांच्या मर्जीनुसारच करणार आहे. आईवडील म्हणतील त्या मुलीला पत्नी बनवेन!