कराची : बंदी असलेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा सराव व स्थानिक क्रिकेटसोबत जुळण्याची संधी मिळावी, यासाठी आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमांमध्ये बदल करणो आवश्यक असल्याचे मत पीसीबीने व्यक्त केले आहे.
पीसीबी भ्रष्टाचार विरोधी नियमांमध्ये बदल करण्यास अनुकूल असून, त्याचे मुख्य कारण वेगवान गोलंदाज मोहंमद आमिर आहे. 2क्1क्मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर आमिरवर आयसीसीने बंदी घातली. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान आमिरव्यतिरिक्त पाक संघाचे मोहंमद आसिफ व सलमान बट्ट दोषी आढळले होते. त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांमध्ये बदल झाला, तर त्याचा थेट लाभ पाकिस्तानच्या बंदी असलेल्या अनेक खेळाडूंना मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)