व्हॉलिबॉल
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी डांगरे यांची निवड
व्हॉलिबॉल
राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी डांगरे यांची निवडनागपूर : नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष व भारतीय व्हॉलिबॉल महासंघाचे उपाध्यक्ष विजय डांगरे यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव सुनील हांडे यांची राज्य संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली असून सचिवपदी कोल्हापूरचे बाळासाहेब सूर्यवंशी यांना कायम ठेवण्यात आले आहे. आमदार निवास येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या आमसभेमध्ये २०१५-१९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातील ३५ जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या बैठकीत निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. विवेक केदार यांनी काम पाहिले. याप्रसंगी भारतीय व्हॉलिबॉल महासंघाचे सहसचिव कमलेशकुमार काला आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे निरीक्षक नामदेव शिरगावकर उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी) महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे नवनिर्वाचित कार्यकारिणीअध्यक्ष : विजय डांगरे (नागपूर), उपाध्यक्ष : सी.पी. गुप्ता (गोंदिया), रवीकिरण रेडीज (रत्नागिरी), रतन लिगाडे (धुळे), रवींद्र कांबळे (मुंबई उपनगर), मनीष जोशी ( अमरावती), श्रीनिवास सातुरकर (नांदेड), सुनील साखळे (वर्धा), संदीप पाटील (सांगली). सचिव : बाळासाहेब सूर्यवंशी (कोल्हापूर). कोषाध्यक्ष : सुनील हांडे (नागपूर). सहसचिव : सतीश पोवार (गडचिरोली). लातूर झोन सचिव : मंथन अप्पा पेलणे (उस्मानाबाद), नाशिक झोन सचिव : बी.पी. निकुंभ (नंदूरबार), औरंगाबाद झोन सचिव : अर्शद काझी (जालना), अमरावती झोन सचिव : दिलीप देशमुख (बुलडाणा), नागपूर झोन सचिव : गजानन जीवतोडे (चंद्रपूर), कोल्हापूर झोन सचिव : नीलेश जामनकर (सिंधुदुर्ग), पुणे झोन सचिव : पार्थ जोशी (पुणे).