शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:54 IST

रियाधमध्ये सुरु असलेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.

केदार लेले, लंडन

रियाधमध्ये सुरु असलेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.

आनंदची विजयी वाटचाल !पंधरा फेऱ्या असणाऱ्या वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सहा विजय, नऊ बरोबरी अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे साडेदहा गुणांसह विश्वनाथन आनंद याने अग्र स्थानी झेप घेतली. पण सुरुवाती पासून आघाडीवर असणाऱ्या रशियाच्या व्लादिमिर फेडोसिव आणि नेपोम्नियाची यांनी आनंद ला गाठलेच! उत्तम टायब्रेक असल्यामुळे आनंद आणि फेडोसिव यांच्यात टायब्रेकर खेळवण्यात आला.

आनंदने टायब्रेकर वर फेडोसिवला हरवले! तब्बल पंधरा फेऱ्या संपल्यानंतर विश्वनाथन आनंदला विजेतेपद मिळविण्यासाठी टायब्रेकर प्रकारात व्लादिमिर फेडोसिव वर विजय मिळवणे आवश्यक होता. आनंद जिंकतो का फेडोसिव ही एकच उत्सुकता सर्व बुद्धिबळप्रेमींना होती! आनंदने पहिला डाव जिंकत व्लादिमिर फेडोसिव वर एक गुणाने आघाडी घेतली.  आपले आव्हान टिकवण्यासाठी फेडोसिवला दुसरा  डाव जिंकणे अनिवार्य होते. पण आनंदने दुसरा डाव जिंकला आणि फेडोसिवचा टायब्रेकर मध्ये २-० असा पराभव करत वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ जगज्जेतेपदास गवसणी घातली.

आक्रमक आनंद! बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने पहिल्याच डावात अकोबियन याला काळ्या मोहऱ्यांनिशी पराभूत केले! दुसऱ्या डावात पीटर लेको विरुद्ध बालीदानांची शृंखला रचली आणि मोठ्या दिमाखात दुसरा डाव सुद्धा जिंकला! चौथ्या डावात डेमचेंको विरुद्ध आपल्या वजिराचा बळी देत आनंदने त्याच्यावर मात केली!सातव्या डावात ल्युक मॅकशेन विरुद्ध काळ्या मोहऱ्यांनी खेळताना आनंदने मात करण्याचा सापळा रचला! या सापळ्यात ल्युक मॅकशेन अडकला आणि या स्पर्धेत आनंदने दुसऱ्यांदा काळ्या मोहऱ्यांनी डाव जिंकला!

आनंदने केला मॅग्नस कार्लसनचा खेळ खल्लाससुरुवातीच्या आठ फेऱ्यांमधील चार सामने आनंदनं जिंकले होते, तर चार बरोबरीत सोडवले होते. कार्लसनचं आक्रण तो कसं रोखणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती.

नवव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध काळ्या मोहऱ्यांनी खेळताना आनंदने गुंतागुंतीची व्यूहरचना केली! सर्वशक्तिमान वजीर आणि पांढऱ्या घरातील तिरप्या चालीचा उंट या दोघांचा खुबीने वापर करत त्यानं कार्लनसची कोंडी केली! काळ्या मोहऱ्यांनी खेळताना ३४ चालींमध्ये कार्लसनवर आनंदने खळबळजनक विजय मिळवला!    

वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत चुरस!जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध नववी फेरी जिंकल्या नंतर आनंदला नंतरच्या ४ फेऱ्यांमध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले! दहावी ते तेरावी या चार फेऱ्यांमध्ये मध्ये मुसंडी मारून कार्लसनने आनंदवर अर्ध्या गुणाची निसटती आघाडी मिळवली!  फेरीगणिक गुणतक्ता बदलत होता ज्यामुळे कार्लसन, आनंद, स्वीडलर, फेडोसिव, नेपोम्नियाची आणि वँग हावो यांच्यात चांगलीच चुरस दिसून येत होती! 

मौक्याच्या क्षणी आनंदने केला ग्रीश्चुकचा पराभव! आनंदच्या हातून वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद निसटतं की काय असं वाटतं असताना चौदाव्या फेरीत आनंदने ग्रीश्चुकचा पराभव केला!  पंधराव्या फेरीत आपला डाव बरोबरीत सोडवत आनंदने साडेदहा गुणांसह अग्र स्थानी झेप घेतली! वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा टायब्रेकर वर नेण्यासाठी कार्लसनला ग्रीश्चुक विरुद्ध किमान बरोबरेची आवश्यकता होती पण ग्रीश्चुक ने कार्लसनला पराभवाचा धक्का दिला आणि आनंदचा मार्ग मोकळा झाला!

टायगर जिंदा है!लहानपणी 'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आनंद बुद्धिबळाच्या नकाशावर झळकला आणि तेव्हां पासून 'द टायगर ऑफ मद्रास' ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. 

विश्वनाथन आनंद साठी सन २०१७ काहीसं कठीण आणि निराशापूर्ण गेल होतं! लंडन चेस क्लासिक २०१७ मध्ये झालेली सुमार कामगिरी आणि तीन पराभवांमुळे आनंद ('द टायगर ऑफ मद्रास') चांगलाच डिवचला गेला होता! 

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही... तो काही काळ थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो... घेऊन, तीच दहशत... अन तोच दरारा !!! (लंडन चेस क्लासिक २०१७ नंतर) ज्या लोकांनी आनंद संपला अशी वक्तव्यं केली होती, त्या सर्वांना आनंदने वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून, ‘टायगर जिंदा है’ असा ईशाराच दिला आहे! 

टॅग्स :Chessबुद्धीबळViswanathan Anandविश्वनाथन आनंद