केदार लेले ल्ल लंडन
भारताच्या विश्वनाथन आनंद याने एक फेरी बाकी असतानाच बिल्बाव मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. पाचव्या फेरीत आनंदने युक्रेनच्या रसलन पोनोमारिओव याला बरोबरीत रोखले, तर अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन याने व्ॉलेजो पॉन्स याला बरोबरीत रोखले.
स्पर्धेत शेवटची फेरी बाकी असताना विश्वनाथन आनंदचे 11 गुण झाले, तर लेवॉन अरोनियनचे 7 गुण झाले आहेत. रसलन पोनोमारिओवचे 5 गुण, तर व्ॉलेजो पॉन्सचे दोन गुण झाले आहेत. फुटबॉल स्पर्धेप्रमाणो गुण देण्यात येणा:या या स्पर्धेत शेवटची फेरी बाकी असताना आनंदने 4 गुणांची निर्विवाद आघाडी घेतल्यामुळे स्पर्धेतील शेवटच्या फेरीत फक्त औपचारिकता राहिली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
पोनोमारिओवला आनंदने रोखले
पाचव्या फेरीत रसलन पोनोमारिओव विरुद्ध काळ्या मोह:यांनी खेळताना पुन्हा एकदा विश्वनाथन आनंदने क्वीन्स गँबिट डिक्लाईंड प्रकारातील रॅगोझीन बचाव पद्धतीने प्रत्युत्तर दिले. अनुक्रमे 16 व्या चालीवर प्याद्याची चाल आणि 17 व्या चालींवर हत्तीची चाल रचत आनंदने डावात समानता आणली. पुढील चालींमध्ये मोह:यांची अदलाबदली होत राहिली आणि 3क् व्या चालींवर वजिरा-वजिरी झाली. त्यानंतर आनंदने उंटाच्या आणि अश्वाच्या साहाय्याने टाळता न येण्यासारखे शह देत पोनोमारिओवला डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले.