केदार लेले - लंडन
बिल्बाव मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा चौथ्या फेरीत भारताच्या विश्वनाथन आनंद याने स्पेनच्या व्ॉलेजो पॉन्सवर विजय मिळवीत स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. चौथ्या फेरीत आनंदचा हा तिसरा विजय. अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन याने रसलन पोनोमारिओवला बरोबरीत रोखले.
चौथ्या फेरीत पांढ:या मोह:यांनी खेळताना विश्वनाथन आनंदने वजिरासमोरील प्याद्याने सुरुवात केली. त्यास व्ॉलेजो पॉन्स याने क्विन्स गँबीट अॅक्सेप्टेड पद्धतीने प्रत्युत्तर दिले. उत्तम तयारी दर्शवीत 12व्या चालीवर आनंदने पांढ:या घरातील उंटाची अदलाबदली केली. त्यानंतर 17व्या चालीवर अश्वाची उत्कृष्ट चाल करीत आनंदने पटावर आपले वर्चस्व सिद्ध केले. पटावर समानता आणण्यासाठी व्ॉलेजो पॉन्सने काळ्या घरातील उंटांची अदलाबदली केली; पण आनंदने आपले हत्ती, अश्व आणि वजीर यांच्या आक्रमणाद्वारे व्ॉलेजो पॉन्स याला जेरीस आणले आणि डाव सोडण्यास भाग पाडले.
स्पर्धेच्या दोन फे:या बाकी आहेत. विश्वनाथन आनंदचे 1क् गुण झाले आहेत, तर लेवॉन अरोनियनचे सहा गुण झाले आहेत. रसलन पोनोमारिओवचे चार गुण झाले आहेत आणि व्ॉलेजो पॉन्सचा एक गुण झाला आहे. उद्या, शनिवारी पाचव्या फेरीचे सामने रंगतील. (वृत्तसंस्था)