शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

विश्वनाथन आनंदने ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 18:49 IST

मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून त्याच्यात बुद्धिबळ खेळण्याची जिद्द आणि स्पर्धा जिंकण्याची क्षमता कायम असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली आहे. 

- केदार लेले 

लंडन : मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून त्याच्यात बुद्धिबळ खेळण्याची जिद्द आणि स्पर्धा जिंकण्याची क्षमता कायम असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली आहे. 

आनंदची विजयी वाटचाल !ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत चार विजय, एक हार आणि चार बरोबरी अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे सहा गुणांसह विश्वनाथन आनंदने ही स्पर्धा आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक गुणांच्या आघाडीने मोठ्या दिमाखात जिंकली!

आनंदची आक्रमक सुरुवात!अनुक्रमे दानिल दुबॉव आणि नेपोम्नियाची यांचा पहिल्या दोन फेरीत पराभव करीत आनंदने स्पर्धेत आघाडी घेतली! पण तिसऱ्या फेरीत मात्र त्याला मामेद्यारोव कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला!

आनंदचा दृढ आत्मविश्वास!मामेद्यारोव विरुद्ध पराभव झाल्यावर खचून न जाता आनंदने अनुक्रमे स्विडलर आणि क्रॅमनिक यांच्या विरुद्ध आपले डाव बरोबरीत सॊडवले!अनुक्रमे सहाव्या फेरीत नाकामुरा आणि आठव्या फेरीत ग्रीश्चुक यांना पराभूत करीत आनंदने स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली! आठव्या फेरीत दानिल दुबॉव ने मामेद्यारोवला पराभवाचा धक्का दिला तसेच आठव्या आणि नवव्या फेरीत नाकामुराला सलग दन बरोबरी स्वीकाराव्या लागल्यामुळे आनंदचा मार्ग मोकळा झाला! आनंदने ही स्पर्धा आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक गुणांच्या आघाडीने मोठ्या दिमाखात जिंकली!

स्वतःच्या तयारीशी एकनिष्ठ आनंद!दुसऱ्या फेरीत नेपोम्नियाची विरुद्ध खेळली व्यूहरचना ९व्या आणि शेवटच्या फेरीत गेलफंड विरुद्ध खेळण्यास आनंद जर सुद्धा कचरला नाही! गेलफंडच्या काही तासांच्या तयारी समोर स्वतःच्या तयारीशी आनंद जास्त एकनिष्ठ राहिला! तसेच क्रॅमनिक विरुद्ध खेळली व्यूहरचना नाकामुरा विरुद्ध खेळण्यास आनंद जास्त उत्सुक दिसून आला! क्रॅमनिक प्रमाणे नाकामुरा विरुद्ध वजिरा-वजिरी स्वीकारून सुद्धा डावातील तांत्रिक भिन्नता ओळखून त्याने 'नाकामुरा' वर विजय संपादन केला हे विशेष! तसेच कास्परॉव ने ह्या सारख्या परिस्थती मध्ये 'नाकामुरा' वर विजय संपादन केला होता ही तांत्रिक बाब त्याने प्रेक्षकांना दाखवून दिली!

चांगली चाल किंवा व्यूहरचना दिसल्यास न कचरणारा आनंद!'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आनंद ह्या स्पर्धेत तितक्याच जलद गतीने बुद्धिबळ खेळताना दिसला! त्याच्या कुठल्याच प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध तो वेळेच्या कचाट्यात अडकला नाही हे विशेष! परिणामस्वरूपी प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध विचार करायला त्याच्या कडे नेहमीच जास्त वेळ होता! ग्रीश्चुक विरुद्ध चांगली चाल किंवा व्यूहरचना करण्यासाठी आनंदने ४ ते ५ मिनिटे विचार केला! ग्रीश्चुक ह्या व्यूहरचनेत अडकला आणि चूक केली. या चुकीचा फायदा उठवीत आनंदने यंत्राप्रमाणे अचूक आणि सुरेख चाली रचत ग्रीश्चुकवर मात केली!

टायगर जिंदा हैं और ज्यादा खतरनाक हैं !लहानपणी 'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आनंद बुद्धिबळाच्या नकाशावर झळकला आणि तेव्हां पासून 'द टायगर ऑफ मद्रास' ह्या नावाने ओळखला जाऊ लागला.

(लंडन चेस क्लासिक २०१७ नंतर) ज्या लोकांनी आनंद संपला अशी वक्तव्यं केली होती, त्या सर्वांना आनंदने वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून, ‘टायगर जिंदा है’ असा ईशारा दिला होता! ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकत त्याने आपली दहशत आणि दरारा कायम असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली आहे !!!

 

टॅग्स :Chessबुद्धीबळ