धर्मशाला : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार व अक्षर पटेल यांच्या अचूक मा:याच्या जोरावर भारताने शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा 59 धावांनी पराभव करीत मालिका 2-1 ने जिंकली. पाहुण्या संघाने मालिकेतून माघार घेतल्यामुळे पाचवा सामना आता रद्द झाला आहे.
भारताने कोहली (127), सुरेश रैना (71) व अजिंक्य रहाणो (68) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर 6 बाद 33क् धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी वेस्ट इंडीजचा डाव 48.1 षटकांत 271 धावांत गुंडाळला. भारतातर्फे भुवनेश्वर व अक्षर यांनी प्रत्येकी 1क् षटकांत अनुक्रमे 25 व 26 धावांच्या मोबदल्यात 2-2 बळी घेतले. विंडीजतर्फे सॅम्युअल्सने 1क्6 चेंडूंना सामोरे जाताना 112 धावा फटकाविल्या. त्यात 9 चौकार व 6 षटकारांचा समावेश आहे.
(वृत्तसंस्था)
सचिनपेक्षा विराट वेगवान
धर्मशाला : विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2क् शतके पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने आज विंडीजविरुद्ध 127 धावांची खेळी करताना वन-डे कारकीर्दीतील 2क् वे शतक ठकले.
धोनीचा 25क् वा वन-डे
धर्मशाला : महेंद्रसिंह धोनी 25क् किंवा त्यापेक्षा अधिक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 249 सामन्यात 53.15 च्या सरासरीने 8186 धावा केल्या.
भारत : अजिंंक्य रहाणो पायचित गो. बेन 68, शिखर धवन ङो. डॅरेन ब्राव्हो गो. रसेल 35, विराट कोहली धावबाद 127, सुरेश रैना ङो. रामदिन गो. टेलर 71, महेंद्रसिंह धोनी धावबाद क्6, रविंद्र जडेजा ङो. रसेल गो. होल्डर क्2, अंबाती रायडू नाबाद 12. अवांतर (9). एकूण 5क् षटकांत 6 बाद 33क्. गोलंदाजी : टेलर 9-क्-77-1, होल्डर 9-क्-52-1, रसेल 7-क्-48-1, बेन 8-क्-3क्-1, सॅम्युअल्स 1क्-क्-54-क्, डॅरेन ब्राव्हो 6-क्-51-क्, पोलार्ड 1-क्-12-क्.
वेस्ट इंडिज : ड्वेन स्मिथ ङो. शमी गो. यादव क्क्, ब्राव्हो त्रि. गो. पटेल 4क्, पोलार्ड ङो. धवन गो. कुमार 6, मलरेन सॅम्युअल्स त्रि. गो. शमी 112, दिनेश रामदीन ङो. पटेल गो. जडेजा 9, ड्वेन ब्राव्हो पायचित गो. जडेजा क्क्, डेरेन सॅमी ङो. आणि गो. पटेल 16, सरेल त्रि. गो. यादव 46, होल्डर ङो. रैना गो. कुमार 11, टेलर त्रि. गो. शमी 11, बेन नाबाद 1, अवांतर : 19, एकूण : 48.1 षटकांत सर्वबाद 271 धावा. गडी बाद क्रम : 1/1, 2/27, 3/83,4/12क्, 5/121, 6/165, 7/222, 8/239, 9/26क्, 1क्/271. गोलंदाजी : बी. कुमार 1क्-2-25-2, उमेश यादव 9-क्-44-2, शमी 9.1-क्-72-2, कोहली 1-क्-14-क्, अक्षर पटेल 1क्-1-26-2, जडेजा 9-1-8क्-2.