शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

By admin | Updated: June 19, 2017 00:52 IST

शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली

बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमतशेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली. बेभरवशाचा आणि धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाने आपल्याला धोबीपछाड दिला. कुणाच्या ध्यानिमनी नसलेला पाकिस्तानी संघ खेळाच्या तिन्ही क्षेत्रात आपल्याला वरचढ ठरला. पाकिस्तानला हरवूच असा विश्वास असल्याने सेलिब्रेशनची जंगी तयारी झाली होती, पण घात झाला. संपूर्ण देश दुःखात बुडाला. अंतिम लढतीत पराभव, तोही पाकिस्तानकडून स्वीकारावा लागल्याने हा पराभव जिव्हारी लागलाय. भारत ही लढत पराभूत होऊ शकतो, असे कुणाच्या मनातही आले नसेल,पण विराटसेनेसाठी या लढतीत काहीच चांगले झाले नाही. अंतिम लढतीपूर्वी आपला आत्मविश्वास शिखरावर होता. संपूर्ण संघात चिंता करावी अशी काहीच गोष्ट नव्हती. नाणेफेकीचा कौलही आपल्या बाजूने लागला. इथपर्यंत सारे काही आलबेल होते. पण पुढे भारतीय खेळाडू काहीसे बेफिकीरपणे खेळले. त्यात बुमराहच्या गोलंदाजीवर फकर जमानला नोबॉलमुळे जीवदान मिळाले आणि आपले नशीब फिरले. नोबॉल पडले, गोलंदाजी स्वैर झाली. फलंदाजी करताना चुकीच्या वेळी विकेट पडल्या. ओव्हलच्या खेळपट्टीत चिंता करण्यासारखे काहीच नव्हते. पण फलंदाजीतील अतिआत्मविश्वास नडला. मग एक दोन विकेट पडताच धावांच्या दबावासमोर आपले फलंदाज कोलमडले. सुरुवातीलाच सेनापती धारातीर्थी पडल्यावर आपल्या फलंदाजांनी हरी ओम विठ्ठला म्हणत खेळपट्टी ते पॅव्हेलियनची वारी सुरू केली. फटकेबाजी करत असलेल्या पांड्याला जडेजाने सात जन्माचे वैर असल्यासारखे धावचीत करून घातले. बाकी पाकिस्तानने फायनलमध्ये चांगला खेळ केला. त्यांची क्षमता जोखण्यात आपण कमी पडलो. ते या लढतीत फेवरेट नव्हते, त्यामुळे बिनधास्त खेळले. त्यांचा फकर जमान मियाँदादची बॅट घेऊन आल्यासारखा खेळला, तर मोहम्मद आमीरच्या भन्नाट स्पेलने अक्रम, वकारच्या स्पेलची आठवण ताजी केली. पाकिस्तानी खेळाडू भारताविरुद्ध जिद्दीने खेळतात, हे आज त्यांनी पुन्हा एटदा दाखवून दिले. यात विशेष कौतुक करावे लागेल ते पाकिस्ताचा कर्णधार सर्फराझ अहमदचे. सलामीलाच भारताकडून हरल्यावर त्याने संघाला उभारी दिली. गरज असताना स्वतःही चांगली फलंदाजी केली. डीआरएसचा चातूर्याने वापर केला आणि अखेर पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला.आजच्या सामन्याने अधोरेखित केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये खेळापेक्षा मोठा कुणीच होऊ शकत नाही. तुम्ही कुणाला गृहित धरू शकत नाही आणि अमकाच संघ जिंकेल, असे छातीठोकपणे सांगू शकत नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळला. पण आजचा दिवस आपला नव्हताच. आपण आज हरलो म्हणून आपल्या खेळाडूंवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. खेळ आहे, जय-पराजय काय होतच राहतील. सध्या गरज आहे ती विराटसेनेला साथ देण्याची.