शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

विराट कोहली विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर!

By admin | Updated: April 5, 2017 16:32 IST

विराटच्या २०१६ कामगिरीची दखल क्रिकेटमधील बायबल अशी ओळख असलेल्या विस्डेनने घेतली असून, विराटची २०१६ मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ५ - क्रिकेटमध्ये २०१६ हे वर्ष सर्वार्थाने गाजवले ते भारताचा कर्णधार विराट कोहलीने. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०  अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटने धावांचा पाऊस पाडला. त्याबरोबरचा आपल्या कुशल नेतृत्वाखाली भारताला कसोटी क्रमवारीत  अव्वलस्थानीही पोहोचवले. आता विराटच्या या कामगिरीची दखल क्रिकेटमधील बायबल अशी ओळख असलेल्या विस्डेनने घेतली असून, विराटची २०१६ मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. असा मान पटकावणार विराट हा भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनंतरचा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. 
या आठवड्यात प्रकाशित झालेल्या विस्डेनच्या २०१७ च्या वार्षिकांकाच्या मुखपृष्ठावर स्थान स्थान देण्यात आले  आहे. विराटने २०१६ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्राकारात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून २ हजार ५९५ धावा कुटल्या. त्यामध्ये ७ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता. विराटने १२ कसोटीत ४ शतकांसह १२१५ धावा फटकावल्या. तर १० एकदिवसीय सामन्यात ७३९ धावा कुटल्या. तसेच १५ ट्वेन्टी-२० सामन्यात विराटने ६४१ धावांची बरसात केली. 
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी हिची वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच विस्डेनच्या अव्वल ५ क्रिकेटपटूंमध्ये  पाकिस्तानच्या मिसबा उल हक आणि युनिस खानला स्थान देण्यात आले आहे. ख्रिस व्होक्स, रोलैंड जोन्स आणि  बेन डकेट हे या पाच क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवणारे अन्य तीन क्रिकेटपटू आहेत. 
विस्डेनचे संपादक लॉरेन्स बुन विराटचे कौतुक करताना लिहितात, "विराटसाठी २०१६ हे वर्ष स्वप्नवत राहिले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटची सरासरी इतर कुठल्याही फलंदाजाच्या तुलनेत अधिक राहिली. कसोटीत ७५, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९२ आणि ट्वेंटी-२०त १०६च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. तसेच या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतके फटकावण्याचा पराक्रमही त्याने केला."
 2003 पासून विस्डेनने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तीन भारतीयांनी हा मान पटकावला आहे. त्यात विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने २००८ आणि २००९ अशा सलग दोन वर्षांमध्ये विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला होता.