शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली खरोखरचा मिस्टर ३६०

By admin | Updated: May 22, 2016 02:34 IST

आयपीएलचे सुरुवातीचे आठ पर्व उल्लेखनीय ठरले, पण माझ्या मते आयपीएलचे नववे पर्व आतापर्यंतचे सर्वोत्तम पर्व ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे सहभागी सर्व आठ संघांदरम्यान संघर्षपूर्ण लढती खेळल्या गेल्या.

एबी डिव्हिलियर्स लिहितो़ आयपीएलचे सुरुवातीचे आठ पर्व उल्लेखनीय ठरले, पण माझ्या मते आयपीएलचे नववे पर्व आतापर्यंतचे सर्वोत्तम पर्व ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे सहभागी सर्व आठ संघांदरम्यान संघर्षपूर्ण लढती खेळल्या गेल्या. आम्ही बाद फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असतानाही सहा संघ प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंट््स व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांनाही आगेकूच करण्याची संधी मिळाली होती. एका व्यावसायिक लीग स्पर्धेत यापेक्षा अधिक काय विचार करता येईल. निकालाची अनिश्चितता या स्पर्धेची विशेषता असून, त्यामुळे चाहते या स्पर्धेकडे आकर्षित झाले आहेत. दुसऱ्या बाबीचा विचार करता ही लीग टी-२० क्रिकेटचा विकास करण्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. येथे प्रशिक्षक व कर्णधार फलंदाज व गोलंदाजांसाठी वेगवेगळ्या रणनीती तयार करीत असतात. या सर्व बाबी खेळाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. या लीगमुळे खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे. तिसरे कारण युवा व प्रतिभावान खेळाडूंची कामगिरी. सनराझर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानचा आघाडीच्या गोलंदाजांमध्ये समावेश आहे. फिज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेत ४९ षटके गोलंदाजी केली असून, त्याने केवळ प्रतिषटक ६.६१ धावा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माझा सहकारी व दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस मॉरिसने ४१ षटके गोलंदाजी करताना केवळ ६.७५च्या सरासरीने धावा दिल्या. स्पर्धा संस्मरणीय ठरण्यासाठी चौथी व सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीची अनन्यसाधारण फलंदाजी. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आमच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वी त्याने १३ डावांमध्ये ८६.५०च्या सरासरीने ८६५ धावा फटकावल्या आहेत. खेळाच्या इतिहासात कुठल्याही फलंदाजासाठी हा सर्वोत्तम फॉर्मपैकी एक आहे. तो केवळ आयपीएलमध्येच फॉर्मात आहे असे नसून यंदा जानेवारी महिन्यापासून त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे, हे विसरता येणार नाही. त्याने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांत १९९ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर टी-२० आशिया कप स्पर्धेत चार सामन्यांत १५४ आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच लढतीत २७३ धावा फटकावल्या. आतातर ही सर्व कामगिरी आयपीएलसाठी वॉर्म असल्याचे भासत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने फटकावलेल्या बऱ्याच धावांचा मी साक्षीदार आहे. विशेषत: नॉन स्ट्रायकर एन्डवर उभे राहून मी त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे. अचूक टायमिंग व अचूक प्लेसमेंटच्या आधारावर तो मैदानात चौफेर शानदार फटकेबाजी करतो, ते बघून आश्चर्य वाटते. त्यामुळे विराट कोहलीच खरा मिस्टर ३६० आहे. आतापर्यंतच्या सर्वोत्तम आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडू... विराट. (टीसीएम)