बंगळुरू : दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या रविवारी झालेल्या लढतीदरम्यान पावसाचा व्यत्यय आला होता. त्यावेळी रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्माचा अनोखा सिलसिला रंगला होता. त्यावेळी युवराज सिंग सुध्दा येथे होता. या भेटीवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली होती. पण या प्रकरणी विराटला फक्त ताकीद देण्यात आली असल्याचे आयपीएलरचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. शुक्ला म्हणाले, या घटनेला जास्त मोठे करण्याची गरज नाही. मी वैयक्तिक विराटशी बोललो आहे. सामन्यादरम्यान अशी भेट घेणे चुकीचे असल्याचे त्याला सांगितले आहे. भ्रष्टाचारविरोधी तसेच सुरक्षा समितीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आम्हाला सूचना दिल्यास निश्चितपणे विराटला इशारा दिला जाईल. (वृत्तसंस्था)
विराटला फक्त ताकीद
By admin | Updated: May 20, 2015 01:29 IST