शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदरची मैमतअलीवर टीका, चिनी माल अधिक चालणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:00 IST

आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता व भारताचा अव्वल व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने जुल्फिकार मैमतअलीविरुद्धच्या लढतीपूर्वी वाक् युद्धाला प्रारंभ केला.

नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता व भारताचा अव्वल व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने जुल्फिकार मैमतअलीविरुद्धच्या लढतीपूर्वी वाक् युद्धाला प्रारंभ केला. त्याने या बॉक्सरवर टीका करताना लढतीमध्ये झटपट विजय मिळवण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले. चिनी माल अधिक वेळ चालू शकत नाही, अशी टीका विजेंदरने केली.विजेंदर डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे, तर जुल्फिकार डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे. मुंबईतील वरळीमध्ये एनएससीआय स्टेडियममध्ये उभय खेळाडूंदरम्यान ५ आॅगस्ट रोजी खेळल्या जाणाºया लढतीतील विजेता आपले जेतेपद राखण्यासोबतच प्रतिस्पर्ध्यांच्या किताबावरही नाव कोरणार आहे.मैमतअलीसोबत ५ आॅगस्ट रोजी होणाºया लढतीबाबत बोलताना विजेंदर म्हणाला, ‘माझा जोरदार सराव सुरू आहे. मी माझे वजन नियंत्रणात राखले आहे. ५ आॅगस्ट रोजी तुम्ही आणखी एका नॉकआऊट निकालाची प्रार्थना करा. ही लढत झटपट संपविण्यास प्रयत्न राहील. तसे चायनीज माल अधिक वेळ टिकत नाही.’विजेंदर ३१ वर्षांचा आहे, तर त्याचा प्रतिस्पर्धी जवळजवळ नऊ वर्षांनी युवा आहे. चीनच्या बॉक्सरला युवा असल्याचा लाभ मिळेल का, याबाबत बोलताना विजेंदर म्हणाला, ‘त्याचा काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. बॉक्सिंग हा अनुभवाचा खेळ आहे. तुमच्या ठोशामध्ये ताकद असायला हवी. मला २० वर्षांच्या बॉक्सरप्रमाणे वाटत आहे. मी स्वत:ला जुल्फिकारपेक्षा युवा मानतो.’या लढतीनंतर आम्हाला राष्ट्रकुलच्या जेतेपदासाठी आव्हान द्यावे लागले. राष्ट्रकुलचे जेतेपद सध्या ब्रिटनच्या बॉक्सरकडे आहे. त्यानंतर इंटर कॉन्टिनेंटल जेतेपदाचा क्रमांक येतो. हे जेतेपद रशियाच्या बॉक्सरकडे आहे. त्यामुळे आम्ही सध्या यापासून पाच-सहा लढती दूर आहोत.’(वृत्तसंस्था)