नवी दिल्ली : भारताचा आॅलिम्पिक पदकविजेता बॉक्सर विजेंदरसिंग यानेदेखील या सन्मानासाठी आपण दावेदार असल्याचे जाहीर केले. ही दावेदारी फेटाळली तरी मला दु:ख होणार नाही, पण मी या पदकाचा दावेदार आहे, असे स्टार बॉक्सरने सांगून टाकले. सलग दोनवेळा आॅलिम्पिक पदक जिंकणारा मल्ल सुशीलकुमार याची सर्वप्रथम या सन्मानासाठी शिफारस केल्याचे विजेंदरने समर्थन केले. (वृत्तसंस्था)
विजेंदरलाही हवे ‘पद्मभूषण’
By admin | Updated: January 7, 2015 01:45 IST