शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डिंकोच्या उपचारांसाठी मुष्टियोद्धे सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 00:32 IST

जमवली एक लाखाहून अधिक रक्कम

नवी दिल्ली : भारताचा आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा डिंको सिंग सध्या यकृताच्या कर्करोगाशी सामना करत आहे. यासाठी डिंकोच्या उपचारांसाठी भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंग आणि मनोज कुमार आवश्यक आर्थिक मदत जमविण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांव्यतिरिक्त काही अन्य मुष्टियोद्ध्यांनी आणि प्रशिक्षकांनी एक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे सर्व जण मिळून एक लाख रुपयाची मदत थेट डिंकोच्या बँक खात्यात जमा करणार आहेत.याबाबत विजेंदरने सांगितले की,‘आमचा एक ‘हम में है दम’ या नावाचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मनोजने डिंकोच्या आजाराची माहिती दिली होती. यानंतर आम्ही डिंकोच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि सर्व मिळून पैसे जमवत आहोत.’मंगळवारी या मदतकार्याला सुरुवात झाल्याची माहितीही मिळाली. यामध्ये सर्व सदस्यांनी एक हजारापासून २५ हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली आहे. विजेंदरने पुढे सांगितले की,‘आम्ही एक लाखाहून अधिक रकमेची मदत जमा केली आहे आणि ही सर्व रक्कम थेट डिंकोच्या बँक खात्यात जमा होईल. मी २५ हजार रुपयाची मदत दिली असून, काहींनी ११ हजार तर काहींनी ५ हजार रुपयाची मदत केली आहे.’ त्याचप्रमाणे ‘डिंको आमचा हीरो आहे. (वृत्तसंस्था)संकटकाळी एक-दुसऱ्याची मदत करावी, हे प्रत्येक मुष्टियोद्ध्याचे कर्तव्य आहे,’ असेही विजेंदरने यावेळी म्हटले. मनोज कुमारने सांगितले की,‘हे आमचे कर्तव्य आहे. मदत मोठी असो की छोटी, रक्कम महत्त्वाची ठरत नाही. आम्हाला त्याच्यासोबत उभे राहायचे आहे.’

टॅग्स :Vijender Singhविजेंदर सिंगManoj Kumarमनोज कुमार