ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 18 : रायझिंग पुणे सुपरजायंटनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर डकवर्थ लुईस नियमानुसार 19 धावांनी विजय मिळवला आहे. रायझिंग पुणे सुपरजाएंट्सनं 11 षटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात 76 धावा केल्या आहेत. पुण्याकडून रहाणेनं नाबाद खेळीच्या जोरावर 5 चौकार आणि 1 षटकार खेचत 42 धावा काढून धडाकेबाज सुरुवात केली. ख्वाजाही 13 चेंडूंत 4 चौकारांसह 19 धावा काढून तंबूत परतला. बेलीनं नाबाद राहत 1 चौकाराच्या जोरावर 8 धावा काढल्या आहेत.
त्याआधी अखेरच्या स्थानावर असलेल्या रायझिंग पुणे सुपरजायएन्ट्स संघाने दिल्लीविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंजादीचा करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार धोनीनं घेतलेला हा निर्णाय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं अचूक काम केलं. गोलंदाजांनी केलेल्या अचूक टप्याच्या माऱ्याच्या जोरावर पुणे संघाने दिल्लीला निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावांवर रोखले. पुण्यातर्फे डिंडा आणि अॅडम जम्पा यांनी प्रत्येकी ३ फलंदाजांना बाद केले. करुण नायरने एकतर्फी झुंज देताना संयमी ४१ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात मॉरिसने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या १००च्या पार केली. मॉरिसने २० चेंडूंत ३६ धावांची खेळी केली. डी कॉक २, अय्यर ८ , पंत ४, सॅमसन १०, ड्युमिनी १४ धावांची खेळी केली.