शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विजय क्लबने पटकावले शानदार विजेतेपद

By admin | Updated: December 28, 2014 01:52 IST

अंतिम सामन्यात ना.म. जोशी मार्गच्या बंड्या मारुती संघाचे तगडे आव्हान १८-१६ असे परतावून लावत प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.

मुंबई : दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ना.म. जोशी मार्गच्या बंड्या मारुती संघाचे तगडे आव्हान १८-१६ असे परतावून लावत प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.प्रभादेवी येथील यंग भारत सेवा मंडळाच्या वतीने राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उच्च दर्जाचा खेळ करताना प्रेक्षकांना खूश केले. विजय क्लबचा हुकमी आक्रमक विजय दिवेकरची सुरुवातीलाच यशस्वी पकड करताना धमाकेदार सुरुवात केली. विनोद आयाळकरनेदेखील आक्रमक व खोलवर चढाई करताना बंड्या मारुती संघाला ४-० असे आघाडीवर नेले. यानंतर मात्र या धक्क्यातून सावरताना विजय क्लबने आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली.कमलेश नांदोस्करने आक्रमक चढाई करताना अप्रतिमरीत्या एकाचवेळी सागर पाटील व विनोद आयाळकरला टिपताना विजय क्लबच्या संघात जोश आणला. यानंतर अजिंक्य कापरेने मिळालेल्या जीवदानाचा अचूक फायदा उचलताना एकाच चढाईमध्ये ४ गडी टिपताना विजय क्लबला आघाडीवर नेले. तर १३व्या मिनिटाला फॉर्ममध्ये आलेल्या विजय क्लबने प्रतिस्पर्धी बंड्या मारुतीवर लोण चढवताना १९-६ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले. मध्यांतरानंतर पिछाडीवर पडलेल्या बंड्या मारुती संघाच्या विनोद आयाळकर, जितेश सापते यांनी झुंजार खेळ करताना संघाचे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजिंक्य कापरे, कमलेश नांदोरकर आणि विजय दिवेकर यांच्या मजबूत चढाई-पकडीच्या जोरावर विजय क्लबने अखेरच्या क्षणी अवघ्या २ गुणांनी बंड्या मारुतीला नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)