ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाचे सिलेदार लवकरच सुरू होणा-या दुस-या कसोटीत विजयी पुनरागमन करण्यासाठी कसून तयारी करत आहेत. मात्र विजय मिळवण्यासाठी दडपण न घेता नॅचरल खेळ करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी टीम इंडियाचे सर्व शिलेदार नुकतेच पुण्यातील ताम्हिणी घाट येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. या ट्रेकमध्ये कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रवींद्र जाडेजा तसेच प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाही सहभागी झाले होते. त्यांच्या या ट्रेकचा व्हिडीओ बीसीसीआयने पब्लिश केला असून सर्वजण ट्रेकिंगचा आनंद लुटताना दिसत आहेत.
येत्या ४ तारखेपासून बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे.
VIDEO: A day off watching the sunset and trekking the mountains. #TeamIndia spend some quality time off the field https://t.co/dnMiMtMwGz— BCCI (@BCCI) February 28, 2017