शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

विजयी सीमोल्लंघनाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 12, 2016 07:04 IST

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला चेतेश्वर पुजाराने (१०१*) झळकावलेल्या नाबाद शतकानंतर हुकमी एक्का रविचंद्रन आश्विनने (७/५९) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर

इंदूर : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला चेतेश्वर पुजाराने (१०१*) झळकावलेल्या नाबाद शतकानंतर हुकमी एक्का रविचंद्रन आश्विनने (७/५९) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या दिवशीच बाजी मारताना न्यूझीलंडचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडला. या दणदणीत विजयासह टीम इंडियाने किवींना क्लीन स्वीप देतानाच आयसीसी क्रमवारीतील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले. शिवाय, या वेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मानाची गदादेखील सुपूर्त केली. टीम इंडियाने या विजयासह कसोटी सामन्यात धावांच्या बाबतीत आपला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा विजय साकारला. त्याचबरोबर इंदूरच्या होळकर स्टेडियममध्येही भारताने आपली विजयी कामगिरी कायम राखली. याआधी होळकर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या चारही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली होती. पुजाराने झळकावलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ३ बाद २१६ धावांवर घोषित करून न्यूझीलंडला विजयासाठी ४७५ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या आव्हानाखाली सुरुवातीपासून दबलेल्या न्यूझीलंडचा डाव ४४.५ षटकांत १५३ धावांवर गडगडला. पहिल्या डावात ८१ धावांत ६ बळी घेणाऱ्या आश्विनने दुसऱ्या डावातही आपला जलवा दाखवताना १३.५ षटके गोलंदाजी करून ५९ धावांत ७ बळी घेऊन किवींना चांगलेच गुडघे टेकण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, आश्विनने आपल्या कारकिर्दीमध्ये सहाव्यांदा सामन्यात १० किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची किमया केली. सामन्यात सर्वाधिक १३ बळी घेऊन आश्विनने सामनावीरासह मालिकावीराचा किताबही पटकावला.न्यूझीलंडला २९९ धावांत गारद करून २५८ धावांची आघाडी घेतलेल्या यजमानांनी पुजाराचे शतक आणि दोन वर्षांनी पुनरागमन केलेल्या गौतम गंभीरच्या (५०) अर्धशतकाच्या जोरावर दुसरा डाव ३ बाद २१६ धावांवर घोषित करून न्यूझीलंडला विजयासाठी ४७५ धावांचे लक्ष्य दिले. पुजाराने १४८ चेंडूंत ९ चौकारांसह खेळी सजवली, तर गंभीरने ५६ चेंडंूत ६ चौकारांसह अर्धशतक झळकावले. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे फलंदाज सुरुवातीपासूनच दडपणाखाली आले. त्यांनी दडपण झुगारण्याचा प्रयत्न करताना एक वेळ आक्रमक पवित्राही घेतला. परंतु, आश्विन आणि जडेजाच्या फिरकीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर, मार्टिन गुप्टिल (२९) आणि कर्णधार केन विल्यम्सन (२७) यांनी कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आश्विनने दुसऱ्या डावात विल्यम्सन, टेलर, ल्यूक राँकी (१५), मिशेल सँटनर (१४), जीतन पटेल (०), मॅट हेन्री (०) आणि टे्रंट बोल्ट (४) यांना बाद करून किवींच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याच वेळी आश्विनने किवी कर्णधार विल्यम्सनला चौथ्यांदा या मालिकेत आपली शिकार केले. तसेच, रवींद्र जडेजाने सलामीवीर गुप्टिल आणि जेम्स नीशम (०) यांना बाद केले. उमेश यादवने एक महत्त्वपूर्ण बळी घेताना टॉम लॅथमला (६) माघारी धाडले. (वृत्तसंस्था)

धावफलक-भारत (पहिला डाव) : १६९ षटकांत ५ बाद ५५७ धावा (घोषित).न्यूझीलंड (पहिला डाव) : ९०.२ षटकांत सर्व बाद २९९ धावा.भारत (दुसरा डाव) : मुरली विजय धावबाद (गुप्टिल/वॉटलिंग) १९, गौतम गंभीर झे. गुप्टिल गो. पटेल ५०, चेतेश्वर पुजारा नाबाद १०१, विराट कोहली पायचीत गो. पटेल १७, अजिंक्य रहाणे नाबाद २३. अवांतर : ६. एकूण : ४९ षटकांत ३ बाद २१६ धावा. गोलंदाजी : टे्रंट बोल्ट ७-०-३५-०; जीतन पटेल १४-०-५६-२; मिशेल सँटनर १७-१-७१-०; मॅट हेन्री ७-१-२२-०; जेम्स नीशम ४-०-२७-०.न्यूझीलंड (दुसरा डाव) : टॉम लॅथम पायचीत गो. यादव ६, मार्टिन गुप्टिल पायचीत गो. जडेजा २९, विल्यम्सन पायचीत गो. आश्विन २७, रॉस टेलर त्रि. गो. आश्विन, ल्यूक राँकी त्रि. गो. आश्विन १५, नीशम झे. कोहली गो. जडेजा ०, बीजे बॉटलिंग नाबाद २३, मिशेल सँटनर त्रि. गो. आश्विन १४, जीतन त्रि. गो. आश्विन १४, हेन्री झे. शमी गो. आश्विन ०, टे्रंट बोल्ट झे. व गो. आश्विन ४. अवांतर : ३. एकूण : ४४.५ षटकांत सर्व बाद १५३ धावा. गोलंदाजी : शमी ७-०-३४-०; यादव ८-४-१३-१; आश्विन १३-५-२-५९-७; जडेजा १६-३-४५-२.