विज्क आन जी (नेदरलॅण्ड) : पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने आठव्या फेरीत अजरबेजानच्या शखरियार मामेदयार्तोव याचा पराभव केला. यासह त्याने नेदरलँड्स येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेच्या मॅगनस कार्लसनसोबत संयुक्त आघाडी घेतली.याआधीच्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर क्रामनिकला पराभूत करणाऱ्या आनंदने शानदार प्रदर्शन कायम राखले. त्याने विश्व क्रमवारीत तिसºया स्थानावरील मामेदयार्ताेव याचा पराभव केला. आनंद व कार्लसनचे आठ फेºयांंतून ५.५ गुण झाले आहेत. कार्लसनने हंगेरीच्या रिचर्ड रेपोर्टला नमवले होते. आनंद आणि कार्लसन यांच्यानंतर रशियाचा इयान नेपोमनियाची, चीनचा डिंग लीरेन व स्थानिक खेळाडू अनीश गरी यांचे प्रत्येकी ५ गुण आहेत.
आनंदचा विजय; संयुक्त आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:08 IST