शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

व्हीनस अंतिम फेरीत

By admin | Updated: October 3, 2015 00:29 IST

जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू अमेरीकेच्या व्हीनस विलियम्सने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात इटलीच्या रॉबर्टा विंचीला नमवले

वुहान : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू अमेरीकेच्या व्हीनस विलियम्सने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात इटलीच्या रॉबर्टा विंचीला नमवले आणि वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे यंदाच्या यूएस ओपन उपांत्य सामन्यात विंचीने धक्कादायक निकाल नोंदवताना बलाढ्य सेरेना विलियम्सला नमवून तीचे कॅलेंडर ग्रँडस्लॅमचे स्वप्न धुळीस मिळवले होते. या विजयासह व्हीनसने आपल्या लहान बहिणीच्या पराभवाचा वचपा काढला.३५ वर्षांच्या अनुभवी व्हीनसने चुरशीच्या झालेल्या या लढतीत आपला सर्व अनुभव पणास लावत विंचीचे कडवे आव्हान ५-७, ६-२, ७-६ असे परतावून लावले. विशेष म्हणजे विंचीने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकताना आश्चर्यकाराक आघाडी घेतली होती. यावेळी विंची व्हीनसला धक्का देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र व्हीनसने झुंजार खेळ करताना जबरदस्त पुनरागमन केले.दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना व्हीनसने वेगवान सर्विस आणि ताकदवान फटके मारताना विंचीला बेजार केले. केवळ दोन गेम गमावून व्हीनसने सहजपणे सेट जिंकून सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला. अंतिम सेटमध्ये पुन्हा एकदा तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला.दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारुन आत्मविश्वास मिळवलेली व्हीनस अधिक आक्रमक दिसली. त्याचवेळी विंची सहजासहजी हार मानण्यास तयार नसल्याने प्रेक्षकांना उच्च दर्जाचा खेळ पाहण्यास मिळाला. व्हीनसने ३-१ अशी आघाडी घेत तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व मिळवले होते. मात्र विंचीने दमदार खेळ करताना ५-५ अशी बरोबरी साधली. यानंतर टायब्रेकमध्ये गेलेल्या या सेटमध्ये व्हीनसने निर्णायक क्षणी खेळ उंचावताना विंची पुन्हा धक्कादायक निकाल नोंदवणार नसल्याची खबरदारी घेत बाजी मारली. दरम्यान ७ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेल्या व्हीनसने तीन तास पर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवत कारकिर्दीत ७७व्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (वृत्तसंस्था)