शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

युवीची फटकेबाजी! सनरायझर्सची विजयी सलामी

By admin | Updated: April 5, 2017 23:57 IST

गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 5 -  गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. युवराज सिंग आणि मोझेस हेन्रिक्स यांची फटकेबाजी, त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आज झालेल्या सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 35 धावांनी मात केली. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनदीप सिंग (24) आणि ख्रिस गेल (32) यांनी बंगळुरूला आक्रमक सुरुवात करून दिली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर बंगळुरूचा डाव गडगडला. केदार जाधवने (31) फटकेबाजी केली, पण तो धावचीत झाल्यावर सामन्याचे पारडे पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकले. अखेर शेवटच्या षटकात बंगळुरूचा डाव 172 धावांवर संपुष्टात आला. हैदराबादकडून भूवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.  
तत्पूर्वी  गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल-10 मधील सलामीच्या लढतीत 4 बाद 207 धावा फटकावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी 208 धावांचे आव्हान ठेवले होते. युवराज सिंगने अवघ्या 27 चेंडूत केलेली 62 धावांची झंझावाती खेळी आणि मोझेस हेन्रिक्स व शिखर धवनने केलेल्या समयोचित फलंदाजी हे हैदराबादच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर अनिकेत चौधरीने डेव्हिड वॉर्नरला (14) माघारी धाडत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र हैदराबादी फलंदाजांनी बंगळुरूंच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. शिखर धवन (40) आणि मोझेस हेन्रिक्स (52) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणले. त्यानंतर युवराज सिंगने अवघ्या 27 चेंडूत 62 धावांची स्फोटक खेळी करत हैदराबादला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकात बेन कटिंग (नाबाद 16) आणि दीपक हुडा नाबाद (16) यांनी 17 धावा वसूल करत हैदराबादला 4 बाद 207 अशी तगडी धावसंख्या उभारून दिली.