शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

उथप्पा, गंभीरचा झंझावात; पुणे भुईसपाट

By admin | Updated: April 27, 2017 06:19 IST

कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोतकात्याने पुण्यावर सात विकेटने दणदणीत विजय मिळवला

ऑनलाइन लोकमत पुणे, दि.26 - रॉबिन उथप्पा व कर्णधार गौतम गंभीर यांच्या झंझावातापुढे रायझिंग सुपरजायंट संघाचे आव्हान वाहून गेले. कोलकाता नाईट रायडर्सने ३ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा करीत विजय संपादन केला. आरसीबीला केवळ ४९ धावांमध्ये गुंडाळून ‘आयपीएल’च्या इतिहासातील विक्रमी कामगिरी करणाऱ्या कोलकाताने तोच धडाका कायम ठेवत पुण्याला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. या विजयामुळे कोलकाताने गुण तालिकेत मुंबई इंडियन्सला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

रायझिंग सुपरजायंट पुण्याने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सुनील नरेन व कर्णधार गौतम गंभीर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्रा घेतला. बिग बॅशमध्ये सलामीला येत यश संपादन केलेल्या वेस्ट इंडिजचा गोलंदाज नरेन याने नेहमीप्रमाणे आक्रमक फटकेबाजी केली. मात्र, बुधवारी त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्याने तीन चौकारांच्या साह्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ठाकूरच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला.त्यानंतर फलंदाजीस आलेल्या रॉबिन उथप्पा यानेही आक्रमक फलंदाजीसच सुरुवात केली. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल जयदेव उनाडकट याच्याकडून सुटला. यावेळी तो अवघ्या १२ धावांवर खेळत होता. त्यानंतर मात्र, त्याने पुण्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने अवघ्या २६ धावांत आपले अर्धशतक झळकावले. उथप्पाने मैदानाच्या चारही बाजूला नेत्रदीपक फटके मारले. दुसऱ्या बाजूने कर्णधार गौतम गंभीरने सावध फलंदाजी करीत उथप्पाला साथ दिली. त्यानेही ३५ चेंडूत पाच चौकार व एका षटकाराच्या साह्याने अर्धशतक झळकावले. उथप्पाने ४६ चेंडूंत सहा षटकार व सात चौकारांच्या साह्याने ८७ धावा केल्या. जिंकण्यासाठी अवघ्या पाच धावा आवश्यक असताना उनाडकटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यांनतर लगेचच ख्रिस्तियनच्या चेंडूवर गंभीर झेलबाद झाला. गंभीरने ४६ चेंडूत एक षटकार व सहा चौकारांच्या साह्याने ६२ धावा केल्या. त्यांनतर आलेल्या ब्राव्हो व मनीष पांडे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.(क्रीडा प्रतिनिधी)धावफलक रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे यष्टीचित उथप्पा गो. नरेन ४६, राहुल त्रिपाठी त्रिफळा गो. चावला ३८, स्टीव्ह स्मिथ नाबाद ५१, महेंद्रसिंग धोनी यष्टीचित उथप्पा गो. कुलदीप यादव २३, मनोज तिवारी यष्टीचित उथप्पा गो. कुलदीप यादव १, डॅनियल ख्रिस्तीयन झे. पांडे गो. यादव १६ ; अवांतर ७ एकूण २० षटकांत ५ बाद १८२; गोलंदाजी : उमेश यादव ३-०-२८-१, क्रिस वोक्स् ३-०-३८-०, सुनील नरेन ४-०-३४-१, ग्रँडोम २-०-१४-०, पीयूष चावला ४-०-३६-२, कुलदीप यादव ४-०-३१-२ कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन धावचित (ठाकूर/धोनी) १६, गौतम गंभीर झे. ठाकूर गो. ख्रिस्तीयन ६२, रॉबिन उथप्पा झे. त्रिपाठी गो. उनाडकट ८७, डॅरेन ब्राव्हो नाबाद ६, मनीष पांडे नाबाद ०; अवांतर १३ एकूण १८.१ षटकांत ३ बाद १८४; गोलंदाजी : जयदेव उनाडकट ३-०-२६-१, शार्दुल ठाकूर ३.१-०-३१-०, वॉशिंग्टन सुंदर ३-०-३२-०, डॅनियल ख्रिस्तीयन ४-०-३१-१, इम्रान ताहीर ४-०-४८-०, राहुल त्रिपाठी १-०-१२-१.