सिडनी : आठवेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन, वेगवान धावपटू उसेन बोल्ट व्यावसायिक फुटबॉल विश्वात पदार्पण करणार आहे. तो आॅस्ट्रेलियातील लीगमध्ये खेळणाऱ्या कोस्ट मायनर्स संघासोबत सराव करणार आहे.मागच्यावर्षी अॅथ्लेटिक्सला अलविदा करणारा बोल्ट मँचेस्टर युनायटेडचा चाहता आहे. तो दीर्घकाळ फुटबॉल खेळू इच्छितो. जर्मनी, नॉर्वे आणि द. आफ्रिकेतील अनेक संघांकडून खेळला देखील आहे.कोस्ट मायनर्सने स्वत:च्या वेबसाईटवर ही माहिती दिली. त्यानुसार ‘क्लब आणि उसेन बोल्ट व्यावसायिक फुटबॉल कधीपर्यंत खेळत राहतील, याची शाश्वती नाही.’ आठवेळेच्या आॅलिम्पिक चॅम्पियनचे मात्र व्यावसायिक फुटबॉलचे स्वप्न साकारणार आहे. लीगचे सत्र आॅक्टोबरपासून सुरू होत आहे.
उसेन बोल्ट फुटबॉल मैदानात पदार्पण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 04:08 IST