शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपनला मिळणार नवा चॅम्पियन; कॅस्पर रुड- कार्लोस अल्काराज यांच्यात अंतिम लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 06:50 IST

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या रुडने  उपांत्य सामन्यात रशियाच्या करेन खचानोवचा ७-६, ६-२, ५-७, ६-२ ने पराभव केला.

न्यूयॉर्क : येथे सुरू असलेल्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेला यंदा पुरुष गटात नवा चॅम्पियन मिळणार आहे.  नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि स्पेनचा कार्लोस अल्काराज हे अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. तिसऱ्या मानांकित अल्काराजने उपांत्य फेरीच्या पाच सेटमधील लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचा ६-७, ६-३, ६-१, ६-७, ६-३ ने पराभव करीत प्रथमच ग्रॅन्डस्लॅमची अंतिम फेरी गाठली. या विजयानंतर १९ व्या वर्षी अल्काराज जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याच्या स्थितीत आला. यासाठी त्याला रुडचे कडवे आव्हान मोडीत काढावेच लागेल. 

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या रुडने  उपांत्य सामन्यात रशियाच्या करेन खचानोवचा ७-६, ६-२, ५-७, ६-२ ने पराभव केला. नार्वेच्या या २३ वर्षांच्या  खेळाडूने यंदा दुसऱ्यांदा ग्रॅन्डस्लॅमची अंतिम फेरी गाठली आहे. जूनमध्ये तो फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत राफेल नदालकडून पराभूत झाला होता. 

सॅलिसबरी- राजीव राम पुरुष दुहेरीत विजेतेब्रिटनचा जो सॅलिसबरी आणि अमेरिकेचा राजीव राम यांनी सरळ सेटमध्ये वेस्ले कूलहोफ- नील स्कूप्स्की यांच्यावर ७-६,७-५ ने विजय नोंदवून यूएस ओपन टेनिसच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकाविले.