US Open 2025 Women's Singles Winner Aryna Sabalenka : महिला टेनिस जगतातील बेलारुसच्या नंबर वन आर्यना संबालेंका हिने वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये ज्या अमेरिकन अमांडा अनिसिमोव्हा हिने संबालेंकाला पराभवाचा दणका दिला होता. बेलारुसच्या सुंदरीनं घरात घुसून या पराभवाचा बदला घेत अमांडा अनिसिमोव्हाचे पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न धुळीस मिळवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तीन वर्षांत जिंकली चौथी ग्रँडस्लॅम स्पर्धा
गत चॅम्पियन आर्यना संबालेंका हिने अमेरिकन ओपन स्पर्धेतील सलग दुसऱ्या जेतेपदासह चौथी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. याआधी २०२३ आणि २०२४ मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा गाजवली होती. गतवर्षी तिने पहिल्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. जेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्याा आर्ययना संबालेंका हिने पहिल्या पासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवलं. पहिला सेट ६-३ असा एकतर्फी आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्येही प्रतिस्पर्धी आणि पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी खेळणाऱ्या अमांडा अनिसिमोव्हा हिने तिला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ती फिकीच ठरली. हा सेट ७-६(३) असा जिंकत संबालेंकानं या स्पर्धेतील विजयी सिलसिला कायम ठेवला.
तुम्हाला माहितीये का? टेनिस कोर्टवरील या सुंदरीला 'द टायगर' नावानं ओळखलं जातं; कारण...
अमांडा अनिसिमोव्हा प्रेक्षकांचा सपोर्ट मिळत असताना शांत डोक्यानं खेळावर फोकस अन्...
पहिल्या सेटमध्ये संबालेंका अगदी कूल अंदाजात खेळली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अमांडा अनिसिमोव्हाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. पण बाहेरच्या मोठ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत तिने खेळावर फोकस केला. चार चुका सोडल्या तर ब्रेक पाइंटमध्ये मिळालेल्या संधीचं सोन करत तिने पहिला सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्येही संबालेंका आघाडीवर होती. पण अमेरिकन स्टारनं कमबॅक करत हा सेट ट्राय ब्रेकरमध्ये नेला. पण त्यानंतर संबालेंकानं पुन्हा कमबॅक करत सामना दुसऱ्या सेटमध्येच संपवला.