शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 07:46 IST

US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner : अल्काराझ याने टेनिस क्रमवारीतील यानिक सिनरचं अधिराज्य संपवत नंबर वनवरही कब्जा केला आहे. 

US Open 2025 Final Carlos Alcaraz Beats Jannik Sinner : अमेरिकन ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये टेनिस स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराझ (Carlos Alcaraz) याने इटालियन यानिक सिनर ( Jannik Sinner) याला ६-२, ३-६, ६-१, ६-४  असे पराभूत करत वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. आर्थर ॲशे स्टेडियमवरील मुख्य कोर्टवरील विजयासह अल्काराझ याने दुसऱ्यांदा ही स्पर्धा गाजवत कारकिर्दीतील सहावे ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले. याशिवाय त्याने टेनिस क्रमवारीतील यानिक सिनरचं अधिराज्य संपवत नंबर वनवरही कब्जा केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यानिक सिनर याने कमबॅक केले, पण...

पहिल्या सेटमध्ये स्पॅनिश कार्लोस अल्काराझनं हवा केली. आक्रमक खेळाचा नजराणा पेश करत त्याने इटालियन यानिक सिनरला बॅकफूटवर ढकलत पहिला सेट ६-२ असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये सामना सहज सोडणार नाही, अशा तोऱ्यात यानिक सिनर याने  दमदार कमबॅक केले. त्यानेहा सेट ६-३ असा आपल्या नावे केला.  पण त्यांतर पुन्हा सर्वोत्तम खेळ करत अल्काराझनं ६-१ आणि ६-४ अशी कामगिरी नोंदवत अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली.

Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा

एका कॅलेंडर ईयरमध्ये ३ फायनल खेळणारी पहिली जोडी 

कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिनर या जोडीनं कोर्टवर उतरताच इतिहास रचला. २०२५ मध्ये ही जोडी तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅममध्ये आमने सामने आली होती. पुरुष एकेरीत एका कॅलेंडर ईयरमध्ये तीन वेळा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणारी ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिली जोडी ठरली. याआधी फ्रेंच ओपनमध्ये दोघांनी फायनल खेळली होती. लाल मातीच्या कोर्टवर (क्ले कोर्ट) कार्लोस अल्काराझ याने बाजी मारली होती. त्यानंतर विम्बल्डनच्या हिरवळीत (ग्रास कोर्ट) फायनलमध्ये यानिक सिनरचा दबदबा पाहायला मिळाला होता. वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेतील हार्ड कोर्टवर कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यात अल्काराझनं फायनल बाजी मारत यंदाच्या वर्षातील ग्रँडस्लॅम स्पर्धेत २-१ अशी कामगिरी नोंदवली. 

टॅग्स :Tennisटेनिस