शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 14:30 IST

Tokyo Olympics 2020: लहानपणीच आई-वडील विभक्त झाले, आईने दुसरे लग्न केले, कौटुंबिक जीवनातील चढ उतारांचा सामना करत बर्क्स इथवर पोहोचली आहे... जाणून घ्या तिचा प्रवास...

अमेरिकेची ओलिम्पिक लॉन्ग जंपर क्यूनेशा बर्क्सचा मॅकडॉनल्ड्स ते ओलिम्पिकपर्यंतचा प्रवास सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा आहे. बर्क्स 10 वर्षांपूर्वीपर्यंत मॅकडॉनल्ड्स रेस्टोरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होती. मात्र, ती आज ओलिम्पिक गेम्समध्ये अमेरिकेकडून पदकाची दावेदार आहे. बर्क्स 16 वर्षांची असताना आपल्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करत होती. ती आपल्या छोट्या बहिणींची जबाबदारी सांभाळण्यासाठी कमी वयातच कामाला लागली होती. मात्र याच वेळी, मॅकडॉनल्ड्स आपले करिअर नाही, याची कल्पनाही तिला होती. (US long jump athlete quanesha burks used to work in mcdonalds and now an Tokyo Olympics)

बर्क्सचे आई-वडील विभक्त झाले होते. तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. कौटुंबिक जीवनातील चढ उतारांचा सामना करत  बर्क्स घराचे बील भरत होती. आपल्या लहान बहिणींना शाळेत घेऊन जात होती आणि घरातील अनेक कामंही करत होती. एवढी बिझी असतानाही ती बास्केटबॉल्स गेम्समध्येही तेवढ्याच उत्साहाने भाग घेत. बास्केटबॉल खेळ अधिक चांगला व्हावा यासाठी बर्क्सने मिडल स्कूल दरम्यान धावणे सुरू केले. यानंतर, बास्केटबॉलमध्ये अनेक स्टेट चॅम्पिअनशिप्स खेळल्यानंतर बर्क्सचे कोच तिला म्हणाले होते, की तुला बास्केटबॉलमध्ये प्रचंड गती आहे. तू आपले करिअर रनिंगमध्ये करायला हवे.

एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन  

बर्क्सने सुरुवातीला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, तिने या खेळातील बारीकसारीक गोष्ठींची माहिती घेतल्यानंतर, या खेळाप्रती तिची रुची वाढली. विशेष करून तिला लॉन्ग जम्प अधिक आवडू लागले. खरे तर या खेळाच्या बाबतीत बर्क्सला फारशी माहिती नव्हती. मात्र, याच खेळासाठी तिला ओलंपिकचे तिकीट मिळाले.

बर्क्सला सुरुवातीला लॉन्ग जम्पदरम्यान वाळूत जम्प करणेही विचित्रच वाटायचे. तिला वाटायचे, की ती विनाकारणच आपले कपडले खराब करत आहे. मात्र, या खेलाप्रती अधिक माहिती घेतल्यानंतर तिचा इंट्रेस्ट अधिक वाढला. हाय स्कूलदरम्यान तिने 13 फुटांची जम्प मारली होती आणि सरासरी पेक्षा ती केवळ 3 इंचच दूर होती. यानंतर काही महिन्यांतच ती 20 फूटांपर्यंत जम्प करत होती. 

Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक

वर्ष 2019 मध्ये यूएस आउटडोर ट्रॅक अँड फिल्ड चॅम्पिअनशिपपूर्वी तीच्या आजोबांचे निधन झाले होते. ती तिच्या आजोबांच्या खूप जवळ होती. त्यांच्या मृत्यूमुळे ती अत्यंत खचून गेली होती. तिची चॅम्पिअनशिपमध्येही भाग घेण्याची इच्छा नव्हती. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिला या चॅम्पियनशिपसाठी तयार केले. बर्क्स म्हणते, की या घटनेमुळे मी मानसिकदृष्ट्या अत्यंत बलशाली झाले आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021AmericaअमेरिकाJapanजपानBasketballबास्केटबॉल