शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दुर्दैव... 'बजरंगा'ची कमाल, पण विराटची झाली धमाल; कुस्तीपेक्षा क्रिकेटलाच झुकतं माप

By स्वदेश घाणेकर | Updated: September 21, 2018 16:58 IST

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे...

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड ( ऑलिम्पिक पदकविजेते) हे देशात क्रीडा क्रांती घडवू पाहात आहेत. त्यासाठी त्यांनी ' Khelo India' या गोड नावाची संकल्पना आणली.. खेळाडूंच्या प्रत्येक पदकाचे कौतुक समारंभ केले. आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना एका समारंभात बोलावून त्यांना ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहण्यास सांगितले... परंतु काल जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर जरा शंका उपस्थित करण्यास भाग पाडले.. 

२०१८ च्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आपल्याला मिळावा असे प्रत्येकाला वाटते आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रचंड मेहनत घेतो. त्यामुळे या पुरस्कारासाठी ही दोन नाव जाहीर झाल्यावर कोणीतरी दुखी होणं साहजिकच होते. तसे झालेही... राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया नाराज झाला आणि त्याने त्वरित न्यायालयात जाण्याची भाषा केली.. 

त्याने मीराबाई किंवा विराट यापैकी कोणावरही आक्षेप नोंदवला नाही, परंतु यंदाचा पुरस्कार हा त्याला मिळायला हवा होता.. ही भावना खरी आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ही कामगिरी या पदकासाठीच्या नियमानुसार पुरेशी आहे. पण या देशात अजूनही क्रिकेटला महत्त्व आहे आणि विराटला मिळालेला हा पुरस्कार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.. ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल, विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद अशा चार वर्षांतून एकदा घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला हा पुरस्कार प्राधान्याने मिळायला हवा. मग विराटने यापैकी कोणते पुरस्कार जिंकले?? चला ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट नाही असे ग्राह्य धरूया.. या व्यतिरिक्त विराट कोणत्या कामगिरीच्या जोरावर खेलरत्न साठी पात्र ठरला? त्याने भारताला कोणती ऐतिहासिक स्पर्धी जिंकून दिली? जरा विचार करा आणि खर सांगा, की विराट कोहली या 'ब्रँड'समोर बजरंग पुनियाचे उल्लेखनीय कर्तृत्व खुजे ठरले का? 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीWrestlingकुस्ती