शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पदाधिकाऱ्यांकडून घेणार हमीपत्र

By admin | Updated: July 25, 2015 02:23 IST

क्रिकेट ‘ क्लीन’ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने बोर्डाच्या सर्वच सदस्यांना ‘दुटप्पी भूमिका नाही’ अशा आशयाचे हमीपत्र भरून

नवी दिल्ली : क्रिकेट ‘ क्लीन’ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने बोर्डाच्या सर्वच सदस्यांना ‘दुटप्पी भूमिका नाही’ अशा आशयाचे हमीपत्र भरून देण्याची सूचना केली आहे. क्रिकेट संघटनेत पदाधिकारी असताना कुठलीही दुटप्पी भूमिका बजावणार नसल्यासंबंधी हे घोषणापत्र लेखी स्वरूपात द्यायचे आहे.बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांची सही असलेले पत्र दोन राज्य संघटनांना मिळालेदेखील. त्यात त्यांनी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना व्यावसायिक हिताची घोषणा करण्यास आणि करारपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. याशिवाय, बीसीसीआयच्या विविध उपसमित्यांवर असलेल्यांनादेखील हे पत्र पाठविण्यात आले. अध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोशाध्यक्ष यांना हे करारपत्र भरून द्यावे लागेल. दुटप्पी भूमिका बजावणार नाही, या नियमांतर्गत बीसीसीआयशीदेखील कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध नसतील, याची हमी द्यायची आहे. एका राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, की आम्हाला बीसीसीआय सचिवांचे पत्र आज मिळाले. अलीकडच्या वादांमुळे बीसीसीआयची प्रतिमा खराब झाली. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांना स्वत:च्या व्यावसायिक हितांबाबत बीसीसीआयला माहिती पुरवावी लागणार आहे.हा अधिकारी पुढे म्हणाला, की करारपत्रात नमूद केल्यानंतरही एखादा अधिकारी बीसीसीआयच्या दुटप्पी भूमिकेत दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला आपल्या पदास मुकावे लागेल. हे करारपत्र भरून देण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला आहे.बीसीसीआयकडून सूचना मिळालेला दुसरा अधिकारी म्हणाला, की क्रिकेटवर लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. २००८ मध्ये आम्ही बीसीसीआय आमसभेत सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडली, त्या वेळी श्रीनिवास हे कोशाध्यक्ष होते आणि त्यांनी चेन्नई सुपरकिंग्स संघ खरेदी केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू राहिलेला माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे हा कर्नाटक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होता. शिवाय त्याने समांतर प्लेयर्स मॅनेजमेंट फर्म उघडले होते. या दोन उदाहरणांवरून त्या वेळी आयपीएल व बीसीसीआय कार्यसमितीत वादळ उठले होते.श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन हे सट्टेबाजीत अडकल्याचे निष्पन्न झाल्याने सीएसके संघावर न्या. लोढा समितीवर दोन वर्षांची बंदी घातली. (वृत्तसंस्था)