शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्टिमेट पिकलबॉल; श्रध्दा-जोआन यांचे सुवर्ण थोडक्यात हुकले, १६ वर्षांखालील गटात सिंग बंधूंची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 21:38 IST

अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा दामनी-जोआन फर्नांडिस यांना अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इंटरमेडिएट महिला दुहेरी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क  - मुंबई : अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा दामनी-जोआन फर्नांडिस यांना अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इंटरमेडिएट महिला दुहेरी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, १६ वर्षांखालील मुलांच्या अत्यंत रोमांचक दुहेरी अंतिम सामन्यात आदित्य-अर्जुन या सिंग बंधूंनी दिमाखात सुवर्ण जिंकले. 

अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने आणि प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेसाठी 'लोकमत' माध्यम प्रायोजक आहे. नवोदित खेळाडूंसाठी असलेल्या इंटरमेडिएट गटाच्या महिला दुहेरीत  श्रध्दा-जोआन यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा-जोआन यांना राजश्री सोमानी-मोनिका मेनन यांच्याविरुध्द अवघ्या एका गुणाने १०-११ असा पराभव पत्करावा लागला. याआधी श्रध्दा-जोआन यांनी रूपाली सिंघल-खुशाली शुक्ला यांचा ११-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली होती. 

१६ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्याने रविवारचा दिवस गाजवला. आदित्य-अर्जुन या भावंडांनी श्वास रोखून धरायला लावलेल्या सामन्यात १७-१५ अशी बाजी मारताना स्तव्य भसिन-मयांक धरमपुरिया यांच्या हातातून सुवर्ण पदक अक्षरशः खेचून आणले. एकवेळ स्तव्य-मयांक १३-९ अशा भक्कम स्थितीत होते. परंतु, आदित्य-अर्जुन यांनी जबरदस्त पुनरागमन करत अखेरच्या क्षणी सुवर्णपदकावर कब्जा केला. 

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्ण पदक जिंकलेल्या स्नेहल पाटीलला महिला खुल्या दुहेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. स्नेहल-वृषाली ठाकरे यांना अंतिम सामन्यात नईमी मेहता-इशा लखानी यांनी १५-५ असे नमवले.  

टॅग्स :Mumbaiमुंबई