तिरंगी
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
विश्वकप क्रिकेट
तिरंगी
विश्वकप क्रिकेट भारताच्या तयारीला धक्कासिडनी : तिंरगी मालिका म्हणजे पुढच्या महिन्यात प्रारंभ होणाऱ्या वन-डे विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या जात होते, पण भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या या तिरंगी मालिकेत संघाची निवड करण्याच्या मुद्यावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन-डे विश्वकप स्पर्धेसाठी संघाचा समतोल साधण्यात अद्याप भारतीय संघाला यश आलेले नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे. तिंरगी मालिका म्हणजे विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या जात होते, पण सध्याची स्थिती लक्षात घेता भारतीय संघ तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. वन-डे क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूंचा नियम लागू झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात सात फलंदाजांना संधी देण्यासाठी घाबरत आहे. आता भिस्त पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांवर असून कामचलावू गोलंदाजांवर विसंबून राहणे आता कमी झाले आहे. आता भारतीय संघ वन-डेमध्ये सहा फलंदाजांसह खेळणारा संघ म्हणून ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सामना संपविण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करीत आहे. सुरेश रैनावर पाचव्या क्रमांवर फलंदाजी करताना दडपण वाढले आहे. भारताने मधल्या फळीमध्ये काही बदल केले आहेत. विराट कोहलीला त्याच्या आवडीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात येत आहे. आघाडीच्या फळीची जबाबदारी शिखर धवन, रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे. त्यापैकी केवळ रोहित शर्मा हाच चांगल्या फॉर्मात आहे. भारताला दुखापग्रस्त रवींद्र जडेजाची उणीव भासत आहे. गेल्या दोन वर्षांत संघव्यवस्थापनने जडेजाला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार केले आहे. त्यानंतर आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार फलंदाजीला येतात. ते फलंदाजीमध्ये थोडे योगदान देण्यास सक्षम आहेत, अष्टपैलू जडेजा फिट झाल्यानंतरच पुनरागमन करू शकेल. त्यामुळे युवा अक्षर पटेलची जडेजाचा पर्याय म्हणून चाचपणी करण्यात येत आहे.